पणजी: राज्य सरकारने (Goa Government) पुन्हा कोविड संचारबंदीत 7 दिवसांनी वाढ केली आहे. याशिवाय केरळमधून येणाऱ्या कर्मचारी, विद्यार्थ्यांना गोव्यात 5 दिवस विलगीकरण सक्तीचे केले आहे.
या विद्यार्थ्यांची विलगीकरणाची व्यवस्था संस्था प्रमुखांनी, तर कर्मचाऱ्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था कार्यालयाने करावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यांना 5 दिवसांनंतर ‘आरटीपीसीआर’ चाचणीस सामोरे जावे लागणार आहे. या दोन्ही व्यतिरिक्त केरळमधून येणाऱ्यांनी कोविड लागण नसल्याचे प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्यांना 5 दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल. दरम्यान, दोन वर्षांखालील मुले, घटनात्मक पदावरील व्यक्ती, नातेवाईकांच्या मृत्यूमुळे राज्यात येणारे, दुसऱ्या राज्यात जाणारे प्रवासी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
38 नवे बाधित
राज्यात गणपती उत्सव सुरू असताना कोरोनाचा प्रसारही सुरू आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. राज्यात आता बळींची संख्या एकूण संख्या 3 हजार 217 एवढी झाली आहे. राज्यात 38 नवे कोराेना बाधित आढळून आले.
5 जणांना डिस्चार्ज
राज्यात आतापर्यंत 1 लाख 74 हजार 836 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 1 लाख 70 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी नव्याने पाच रुग्णांना रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला, तर 14 रुग्णांना दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
50 टक्के क्षमतेने
राज्यातील बार, रेस्टॉरंट्स, जीम हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. रेस्टॉरंट्सला सकाळी 7 ते 11 पर्यंत परवानगी असेल. यात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.