सासष्टी: गोव्यात पोस्ट व टेलिग्रामसाठी वेगळी कचेरी नाही. त्यामुळे गोव्यातील कचेऱ्या या महाराष्ट्र सर्कलअंतर्गत येतात. त्यामुळे गोव्यातील पोस्ट कचेऱ्यांमध्ये पोस्टमास्तर किंवा पोस्टमन नोकऱ्यांसाठी महाराष्ट्रीय लोकांची भरती होते आणि गोमंतकीयांना डावलले जाते. त्यासाठी या कचेऱ्यांमध्ये नोकर भरतीसाठी गोव्यात स्वतंत्र केंद्र असावे, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे. (separate center for postman recruitment in goa)
दक्षिण गोव्याचे (South Goa) खासदार फ्रान्सिस र्दिन यांनी गोव्याशी संबंधित अनेक प्रश्र्न लोकसभेत मांडले. ही माहिती सार्दिन यांनी आज मडगावात पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी लोकसभेत मुरगाव बंदर कार्यक्षेत्राला विरोध करणारा मुद्दा मांडला. मुरगाव बंदराचे नाव बदलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले; पण बंदराचे कार्यक्षेत्र बेतूल ते सेंट जासिंतो बेटापर्यंत वाढविण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. बेतुल क्षेत्रात अनेक समुद्र (Sea) किनारे येतात. त्यामुळे या किनाऱ्यांचा हक्क मुरगाव बंदराला मिळेल. सेंट जासिंतो या बेटावर लोकवस्ती आहे. त्यामुळे पंचायतीसारख्या स्थानिक संस्थांचे अधिकार कमी होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 2020 साली चांदर येथे झालेल्या शांततापूर्ण आंदोलनातील आंदोलकांना समन्स पाठविले आहे. दोन वर्षांनंतरही अशा प्रकारे लोकांची छळवणूक योग्य नव्हे, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.