गोव्यातील ‘इको टुरिझम’ला चालना देणार: विश्‍वजीत राणे

राज्यात पट्टेरी वाघांचा मुक्तसंचार असल्याचे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील अभयारण्य विकसित करून इको टुरिझमला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती नवनिर्वाचित आरोग्य आणि वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. मंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी मुख्य वनसंरक्षक राजकुमार गुप्ता, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. (eco-tourism will be promoted in goa says minister Vishwajit Rane)

Vishwajit Rane
मोपा ‘लिंक रोड’चा मार्ग अखेर मोकळा

प्रामुख्याने अभयारण्यांचे संरक्षण आणि विकास, इको टुरिझमला चालना, वन खाते अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करणे, स्थानिकांना सरकारी योजनांचा लाभ करून देणे आदींचा यात समावेश होता. याबरोबरच वन व्यवस्थापन आणि या विभागाला भेडसावणाऱ्या समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. इको टुरिझम क्षेत्र निर्धारित करून वन महामंडळाचे बळकटीकरण करण्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

व्याघ्रगणना सुरू

राज्यात पट्टेरी वाघांचा (Tiger) मुक्तसंचार असल्याचे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. खरे तर ही पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने अतिशय आनंददायी बाब आहे. यासाठी आता राष्ट्रीय वन्यजीव संस्थान आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सध्या जैवविविधता आणि व्याघ्रगणना सुरू आहे. यासाठी राज्यातील पाचही विभागांतील वन कर्मचारी कार्यरत आहेत. याचा फायदा राज्यात असलेली वनसंपदा समजून घेण्यासाठी होणार असून याची माहितीही अधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांना दिली.

Vishwajit Rane
गोव्यात विविध भागात आज पावसाची शक्यता

स्थानिकांना मिळणार रोजगाराची संधी

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात (Goa) सध्या बीच टुरिझमवरच भर आहे. मात्र, राज्याला लाभलेला समृद्ध नैसर्गिक वारसा आणि वन्य प्राण्यांचा अधिवास या आधारावरती इको टुरिझमला प्रचंड वाव आहे. त्यामुळे इको टुरिझमवर भर देऊन स्थानिक जनतेला रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. यासाठी राज्यात अस्तित्वात असलेली अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि सामाजिक वनिकरणाच्या ताब्यात असलेल्या जागांवर इको टुरिझम वाढवल्यास फायदा होणार आहे. यावर या बैठकीत विशेष चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com