Goa-Ayodhya Astha Train: साखळीतील बेपत्ता ज्येष्ठ नागरिक अखेर सापडला, आपच्या पालेकरांनी उघड केला प्रकार

ट्रेनमधून गेलेला साखळीतील एक ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी उघड केली.
Goa-Ayodhya Astha Train
Goa-Ayodhya Astha TrainDainik Gomantak

Goa-Ayodhya Astha Train

सुमारे 2,000 रामभक्तांना घेऊन सोमवारी (दि.12) सायंकाळी 'आस्था' विशेष ट्रेन गोव्यातून अयोध्येला रवाना झाली. उत्तर गोवा जिल्ह्यातील थिवी रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि.12) सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

या ट्रेनमधून गेलेला साखळीतील एक ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी उघड केली.

ट्रेनमधून गेलेला ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याने राजकीय फायद्यासाठी सुरक्षेत तडजोड केली जात असल्याचा आरोप अमित पालेकर यांनी केला.

पालेकर यांनी बुधवारी पहाटे केलेल्या ट्विटमुळे हा प्रकार उघड झाला.

"गोव्याहून अयोध्येला निघालेल्या ट्रेनमधून माधवपूर रेल्वे स्टेशनवरून साखळी येथील ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती भाजप आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लपवत आहेत का? राजकीय फायद्यासाठी सुरक्षेशी तडजोड केली जात असून, ही गंभीर बाब आहे. त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही तर आम्ही माहिती सार्वजनिक करु," असे ट्विट पालेकर यांनी केले होते.

Goa-Ayodhya Astha Train
Goa to Ayodhya Astha Train: गोव्यातून 2,000 रामभक्तांना घेऊन 'आस्था' ट्रेन अयोध्येला रवाना, CM सावंतही देणार भेट

बेपत्ता व्यक्ती सापडला

दरम्यान, ट्रेनमधून बेपत्ता झालेला ज्येष्ठ नागरिक सापडला असून, तो सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. संबधित ज्येष्ठ नागरिकाला आता पुन्हा गोव्यात पाठवले जाणार आहे. आग्रा जवळील एका स्टेशनवर हा व्यक्ती उतरला होता.

गोव्यातून 2,000 रामभक्तांना घेऊन 'आस्था' विशेष ट्रेन अयोध्येला रवाना झाली. उत्तर गोवा जिल्ह्यातील थिवी रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि.12) सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

देशातील विविध राज्यातून अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना होत आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभरातील रामभक्तांसाठी आस्था ट्रेन चालवल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com