Goa News: वाळपईत 'आत्मा'तर्फे दूध प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन!

Self-Reliant India: तर्फे महिलांना आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण बनविण्याचा निर्धार..
Self-Reliant India
Self-Reliant IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Central Government: केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा होण्यासाठी राज्यात विविध खात्यांमार्फत लोकांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून सत्तरी तालुक्यात वाळपई कृषी विभागीय कार्यालयाच्या ‘आत्मा’ विभागामार्फत सध्या महिलांसाठी दूध प्रक्रिया प्रशिक्षण सुरू केले आहे.

शुक्रवार, 23 रोजी त्याची सुरुवात झाली असून वाळपई-नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात वाळपई परिसरातील विविध स्वयंसाहाय्य गटातील महिला सदस्यांना दुधापासून अस्सल गावठी पेढे बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. फार्म स्कूल या धर्तीवर एकूण सहावेळा ही फार्म शाळा घेतली जाणार आहे.

Self-Reliant India
Goa Municipality: कचरा संकलनाची मुदतवाढ न केल्यास काम बंद करणार!

यासाठी वाळपई कृषी विभागीय अधिकारी विश्वनाथ गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा विभागाच्या सत्तरी तालुका प्रमुख पूनम महाले, साहाय्यक अनिरुध्द गावठणकर व रमेश गावकर, तसेच गोशाळेच्या साधना जोशी, लक्ष्मण जोशी यांच्याकडून सहकारी महिलांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे. दुधापासून दर्जेदार गावठी पेढे कसे बनवावेत याची माहिती साधना जोशींनी सहभागी महिलांना दिली.

Self-Reliant India
Goa Mine: खाण अवलंबितांनो निदान आता तरी जागे व्हा! अन् सरकारला जाब विचारा

पूनम महाले, ‘आत्मा’च्या सत्तरी तालुका प्रमुख-

दरवर्षी आत्माच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध कार्यशाळा घेतल्या जातात. ‘फार्म स्कूल’ ही संकल्पनाही मार्गी लावली आहे. येत्या दसरा, दिवाळीत लक्ष्मी पूजन, भाऊबीज, पाडवा, तुलसी विवाह अशा सणावेळी लोकांना चांगले दुग्धजन्य पेढे उपलब्ध व्हावेत हा मानस ठेवून महिलांना रोजगार मिळावा हा हेतू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com