Pajimol: पाजीमळ येथील निवासी गाळ्यांची दुर्दशा; जलसंपदा खात्याचे दुर्लक्ष, डागडुजी करण्याची गरज

Selaulim Dam Project Pajimol Colony: साळावली धरणाची उभारणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय म्हणून पाजीमळ येथे वसाहत निर्माण करण्यात आली होती. किमान तीस वर्षे या वसाहतीतील निवासी गाळ्यांचा वापर अधिकाऱ्यांसहित कर्मचारीवर्गाने केला.
Selaulim Dam Project Pajimol Colony
Selaulim Dam Project Pajimol Colony Dainik Gomantak
Published on
Updated on

Selaulim Dam Project Pajimol Colony

सांगे: साळावली धरणाची उभारणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय म्हणून पाजीमळ येथे वसाहत निर्माण करण्यात आली होती. किमान तीस वर्षे या वसाहतीतील निवासी गाळ्यांचा वापर अधिकाऱ्यांसहित कर्मचारीवर्गाने केला; पण त्यानंतर हळूहळू वापर कमी होत गेला. त्यामुळे आज परिस्थिती अशी झाली आहे की पूर्ण पाजीमळ वसाहत निर्मनुष्य झाली आहे.

सरकारने या वसाहतीमधील गाळ्यांकडे विशेष लक्ष देऊन चांगल्याप्रकारे डागडुजी करावी. तसेच सांगेत जी सरकारी कार्यालये नाहीत ती कार्यालये येथील निवासी गाळ्यांत सुरू करावीत. नवीन कार्यालये सांगेत आल्यावर जनतेची सोय होऊ शकते.

साळावली धरण पूर्ण झाल्यानंतर हळूहळू या वसाहतीला गळती लागली होती. कित्येक निवासी गाळे आज जमीनदोस्त झाले आहेत. सामान्य अधिकारी, कर्मचारीही बदली घेऊन जाऊ लागल्याने जलसंपदा खात्याने वसाहतीकडे दुर्लक्ष केल्याने अवघ्या तीस-पस्तीस वर्षांत काँक्रिटची वसाहत सडू लागली आहे.

दरम्यान, सांगे ते पाजीमळमधील अंतर केवळ दीड किमीचे आहे. तरीही बाजारपेठ जवळ नसल्याने पाजीमळ येथे कार्यालय सुरू करण्यास खुद्द अधिकारी आणि कर्मचारी नाक मुरडून चुकीचा शेरा मारतात.

Selaulim Dam Project Pajimol Colony
Mega Projects in Goa: गोव्यात का होतोय 'मेगा प्रोजेक्ट्स'ना विरोध? 'गावपण' गमावण्याची भीती की सरकारी 'यंत्रणेवर' अविश्वास?

सांगे अजूनही केपे तालुक्यावर अवलंबून

सांगे तालुका अजूनही जवळच्या केपे तालुक्यावर अवलंबून आहे. कित्येक सरकारी कार्यालये सांगेत नसल्याने सांगेच्या नागरिकांना केपेत जावे लागते. अद्याप सांगे तालुक्यात आर.टी.ओ. कार्यालय नाही.

भू मापन नोंदणी कार्यालय नसल्याने आजही सामान्य जनतेला केपे येथे जाऊन हेलपाटे मारावे लागतात. मध्यंतरी सांगेत कार्यालय सुरु करण्यासाठी जागेची पडताळणी करण्यात येत होती. पण त्या नंतर पुन्हा आवाज बंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com