Margao Market: वाहतुकीची कोंडी, वीजवाहिन्या उघड्यावर; मडगाव न्यू मार्केट समस्यांच्या घेऱ्यात

Margao New Market: व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर म्हणाले, की आग विझविण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत, याचे सर्वेक्षण केले होते.
Margao New Market
Margao New MarketDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावातील न्यू मार्केट हे सासष्टीसह दक्षिण गोव्यातील एक प्रमुख मार्केट असून येथे सुमारे ५०० लहान-मोठी दुकाने आहेत. या मार्केटमध्ये दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. या मार्केटला सुरक्षेसह अन्य समस्यांनी घेरले असून हे प्रश्‍न तातडीने सोडवा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर म्हणाले, की आग विझविण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत, याचे सर्वेक्षण केले होते. तेव्हा फायर हायड्रंटसाठी पाण्याच्या टाकी बसवण्याचे ठरवले होते. मात्र, माशी कुठे शिंकली हे कळत नाही.

शोभा गावकर, दामोदर घोडे या व्यापाऱ्यांनीसुद्धा असेच मत व्यक्त केले. येथील व्यापाऱ्यांसाठी वाहन तळाची गरज आहे. मार्केटबाहेर दुचाकी वाहने ठेवल्याने वाहतुकीची कोंडी होते. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना सुद्धा या समस्यांची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात काहीच सुधारणा केली जात नसल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Margao New Market
Panaji Fish Market: 7 महिन्यांनी प्रतिक्षा संपली! पणजीतील मांस विक्रेत्यांचे होणार पुनर्वसन; महानगरपालिकेची परवानगी

जीवंत वीजवाहिन्या उघड्यावर

येथील वीजवाहिन्या उघड्यावर असल्याने कधी आगीचा भडका उडेल हे सांगता येत नाही. यापूर्वी अनेकदा मार्केटमध्ये आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. आग लागली तेव्हा अनेक त्रुटी लक्षात आल्या. मात्र, त्या सुधारण्याकडे प्रशासनाने लक्ष पुरविले नसल्याचे व्यापारी सांगतात. आग लागण्याची भीती दररोज सतावते.

Margao New Market
Mormugao Fish Market: वास्कोत मासळी मार्केटवरून वाद! मुरगाव पालिकेच्या ताबा घेण्यासाठी हालचाली; विक्रेत्यांनाही सांगितला दावा

खुल्या जागेतील अतिक्रमणे हटवा

हे मार्केट दहा-पंधरा वर्षांपूर्वी होते, तसे राहिलेले नाही. येथील व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही जणांनी तर लोकांना फिरण्यासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमण करून लहान-मोठी दुकाने थाटली आहेत. न्यू मार्केटची इमारत मोडकळीस आली आहे. तिची दुरुस्ती सर्वांत महत्त्वाची आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com