Mormugao Fish Market: वास्कोत मासळी मार्केटवरून वाद! मुरगाव पालिकेच्या ताबा घेण्यासाठी हालचाली; विक्रेत्यांनाही सांगितला दावा

Mormugao Municipal Fish Market: मार्केटसाठी पालिकेने पंधरा कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे या प्रकल्पावर पालिकेचा अधिकार आहे, असे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी स्पष्ट केले.
Mormugao Fish Market
Mormugao Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: येथील नवीन मासळी मार्केट ताब्यात घेण्यासाठी मुरगाव पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. यासंबंधी मंगळवारी (ता.६) झालेल्या पालिका मंडळाच्या खास बैठकीत चर्चा झाली.

या मार्केटसाठी पालिकेने पंधरा कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे या प्रकल्पावर पालिकेचा अधिकार आहे, असे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी स्पष्ट केले. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील मासळी विक्रेते या मार्केटवर आपला अधिकार असल्याचा दावा करतात.

पालिकेने हे मार्केट जीसुडाकडून बांधून घेतले आहे, त्यासाठी पंधरा कोटी खर्च केले आहेत. मार्केटचे काम पूर्ण झाले आहे. परंतु काही कारणास्तव उद्‍घाटनाला विलंब होत आहे.

Mormugao Fish Market
Mormugao: MPA ची ‘ती’ फाटके अजून का पाडली नाहीत? पालिका मंडळ बैठकीत गाजला विषय

या मार्केटात आमचा पहिला अधिकार असेल असे मासळी विक्रेते वारंवार सांगत आहे. याबाबत पालिका व मासे विक्रेत्यांत सामंजस्य करार झाला आहे. परंतु आता पालिकेने या मार्केटावर आपला अधिकार असल्याचा दावा केल्याने तसेच याबाबतची प्रक्रीया सुरू केल्याने मासळी विक्रेते याबाबत आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Mormugao Fish Market
Mormugao House Tax: वाढीव घरपट्टी परत करा! मुरगाववासीय आक्रमक; 4 वर्षे उलटूनही रक्कम पालिकेकडून प्रलंबित

इतरांनाही सामावून घेणार

या मार्केटात आम्हालाही सामावून जावे अशी विनंती करणारे पत्र गोवा फिशिंग ओनर्स असोसिएशनने मुरगाव पालिकेला दिले होते. त्या पत्रावर चर्चा करण्यात येऊन त्यांना तेथे जागा देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. या मार्केटात २५० जागा आहेत. त्यापैकी काही जागा शिल्लक राहणार असल्याने इतरांना सामावून घेण्यास काहीच अडचण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु मासे विक्रेत्यांना हा निर्णय पसंत पडेल काय हा मोठा प्रश्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com