Panaji Fish Market: 7 महिन्यांनी प्रतिक्षा संपली! पणजीतील मांस विक्रेत्यांचे होणार पुनर्वसन; महानगरपालिकेची परवानगी

Panaji Fish Market Meat Vendors: ऑक्टोबर २०२४ मध्ये महानगरपालिकेने जीर्ण झाली म्हणून मासळी मार्केटची इमारत पाडली होती. त्याचा परिणाम येथील १२ दुकान विक्रेत्यांवर झाला होता.
Panaji fish market
Fish market issues in PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सात महिन्यांपासून पुनर्वसनाची वाट पाहणाऱ्या स्थानिक मांस विक्रेत्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. त्यांच्यासाठी मांस विक्रीचे गाळे उभारले जाणार आहेत. या कामाची लवकरच निविदा काढली जाणार आहे. या कामाला महानगरपालिकेच्या मंडळानेही परवानगी दिली आहे.

त्यामुळे मांस विक्रेत्यांची प्रलंबित मागणीही सुटेल, त्याशिवाय मासळी विक्रेत्यांच्या शेडमध्ये नव्याने बैठक व्यवस्था निर्माण केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिका मार्केट समितीचे चेअरमन बेंटो लॉरेन यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

ऑक्टोबर २०२४ मध्ये महानगरपालिकेने जीर्ण झाली म्हणून मासळी मार्केटची इमारत पाडली होती. त्याचा परिणाम येथील १२ दुकान विक्रेत्यांवर झाला होता. कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशन ऑफ गोवा (क्यूएमटीएजी)चे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, बीफ विक्री करणाऱ्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

Panaji fish market
Nerul Fish Market: नेरुळ मासळी बाजार जमीनदोस्त; भर उन्हात मासे विक्रेत्यांवर व्यवसायाची वेळ

त्यांना कर्मचाऱ्यांना काम न करताही वेतन द्यावे लागत आहे. शिवाय पणजीत बीफ खरेदीसाठी येणाऱ्यांना म्हापसा किंवा मडगाव याठिकाणाहून ते उपलब्ध करून द्यावे लागत आहे. इमारत पाडून सात महिने उलटले तरी पुनर्वसनाची चिन्हे दिसत नाहीत. पणजी महागरपालिकेकडे वारंवार पुनर्वसन करावे, अशी विनंती करीत आहोत.

Panaji fish market
Panaji Market: पणजी मार्केटमध्ये सावळागोंधळ! विक्रेत्यांच्या साहित्यामुळे रस्ताच बंद, स्वच्छतेचे तीनतेरा; सुपरवायझरचेही दुर्लक्ष

प्रक्रियेवर लक्ष

उच्च न्यायालयाने आदेश देऊनही महानगरपालिका कधी पुनर्वसन करणार, याकडे मांस विक्रेते डोळे लावून बसले आहेत. परंतु आता महानगरपालिकेने त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. काही दिवसांत या कामाची निविदा काढली जाईल आणि ते काम काही आठवड्यांत पूर्ण केले जाईल, असे मार्केटचे चेअरमन लॉरेन यांचे म्हणणे आहे. मात्र, ही प्रक्रिया केव्हापासून मार्गी लागेल, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com