जुन्या बोरी पुलावरून नदीत कोसळल्याने दोन कामगार बेपत्ता

अन्य दोन कामगारांचा जीव वाचला
Two laborers drowned in Zuari River
Two laborers drowned in Zuari RiverDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जुन्या बोरी पुलाचे लोखंडी सामान सुटे करताना पुलावर चार कामगार करत होते. यातील दोन कामगार झुवारी नदीत कोसळल्याने बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काळोख झाल्याने यात यश आले नाही. सध्या बेपत्ता झालेल्या कामगारांची नावे विजयकुमार यादव (30) आणि छोटेलाल यारे (22) अशी आहेत.

(Two laborers drowned in Zuari River and two lives saved)

Two laborers drowned in Zuari River
दाबोळीतील उड्डाणपुलावर महिला चढल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

या प्रकरणात पुलावरुन पडलेल्या अन्य दोन कामगारांनी पोहत जाऊन नदीचा काठ गाठल्याने त्यांचा जीव वाचला अशी माहिती मायणा - कुडतरी पोलिसांनी दिली. हे चारही कामगार झारखंड येथील असून एका खासगी कंत्राटदारासाठी ते काम करत होते. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Two laborers drowned in Zuari River
MLA Antonio Vas: कुठ्ठाळी येथील मार्केट कॉम्प्लेक्सचे लवकरच लोकार्पण

जुन्या बोरी पुलाचे लोखंडी सामान सुटे करण्याचे काम हे चार कामगार करत होते. हे काम चालू असताना या पुलाचा एक भाग खाली कोसळल्याने हे चारही कामगार पाण्यात फेकले गेले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता कामगारांचा शोध चालू होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com