पणजी : केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते गोवा राज्य मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) सहकार्याने दरवर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आयोजीत करीत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये 20 ते 28 दरम्यान होणाऱ्या इफ्फीसाठी मनोरंजन सोसायटीने तयारी सुरू केली आहे. इफ्फीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
(Goa Entertainment Society is preparing for the film festival)
इफ्फीसाठी चित्रपटांची निवड, उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाविषयीचे सर्व नियोजन, वेळापत्रक हे सर्व काम माहिती व प्रसारण खाते करते, तर मनोरंजन संस्थेला व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी पार पाडावी लागते. त्याशिवाय इफ्फी आयोजित होणारा आयनॉक्स व मनोरंजन सोसायटीचा सर्व परिसर सुशोभित करण्याचे कामही मनोरंजन संस्थाच उचलते.
त्यासाठी केंद्र सरकार काही निधी उपलब्ध करून देते. विविध कामे करण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग मनोरंजन सोसायटीला उभा करावा लागतो. त्यामध्ये ईएसजीसाठी हॉस्पिटॅलिटी, मानवसंसाधन, लेखा विभाग, संगणक तज्ज्ञ आदींची भरती केली जाते.
कला अकादमीबाबत साशंकता
1. इफ्फीचा एक भाग बनलेली कला अकादमी गेल्यावर्षी नूतनीकरणामुळे उपलब्ध झाली नाही. त्यामुळे चित्रपट संख्येवर परिणाम झाला होता. 73 देशांतील 148 चित्रपटांचा समावेश यात होता. यंदाही या महोत्सवासाठी कला अकादमी उपलब्ध होईल की नाही याची शाश्वती दिसत नाही. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना अकादमी यंदा इफ्फीसाठी उपलब्ध होईल, असे वाटत असले तरी कामाचा उरक पाहता त्याविषयी शंका उपस्थित होत आहे.
2. गतवर्षी कोरोनामुळे आभासी पद्धतीने इफ्फीत रसिकांना सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे ओटीटी पद्धतीच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापरही करण्यात आला होता. अकादमीमध्ये प्रारंभीचा आणि समारोपाचा चित्रपट पाहण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था उपलब्ध होते. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्यमापर्यंत अकादमीचे काम पूर्ण झाले तरच तिचा वापर शक्य होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.