Se Cathedral Church: जुने गोवे चर्चची Golden Bell अजूनही नादुरुस्त! ASI चे दुर्लक्ष; चौकशीची होतेय मागणी

Se Cathedral Old Goa Church Golden Bell: गोव्यातील ‘गोल्डन बेल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या से कॅथेड्रलची मुख्य घंटा अनेक महिन्यांपासून तुटलेली होती.
Se Cathedral Old Goa Church Golden Bell
Se Cathedral Old Goa Church Golden BellDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील ‘गोल्डन बेल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या से कॅथेड्रलची मुख्य घंटा अनेक महिन्यांपासून तुटलेली होती आणि सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनादरम्यानही ती नादुरुस्त असल्याने वाजवण्यात आली नाही.

या प्रदर्शनापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गेल्यावर्षी आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे (एएसआय) धर्मगुरूंनी केली होती मात्र अजूनही ती दुरुस्त झाली नाही. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची विनंती झेव्हियर रॉड्रिग्ज यांनी पोलिस व बिशप कार्यालयाला पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

हल्लीच पोपच्या मृत्यूनंतर आणि चर्च आणि चॅपलमध्ये घंटा वाजवाव्या लागतील, असे बिशपच्या परिपत्रकानंतर जुन्या गोव्यातील स्थानिकांनी एकत्र येऊन गोल्डन बेल दुरुस्त केली. जेणेकरून पोपच्या मृत्यूच्या शोकसभेत दोन दिवस ती वाजवणे शक्य झाले.

Se Cathedral Old Goa Church Golden Bell
Old Goa: जुने गोवेत ‘कायम सुविधा’ला ‘खो’! सरकार अडचणीत; पुरातत्व सर्वेक्षण, चर्चला द्यावे लागणार तोंड

पुन्हा एकदा ‘एएसआय’कडे पत्र पाठवून या गोल्डन बेलची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती स्थानिक झेव्हियर रॉड्रिग्ज यांनी दिली.

Se Cathedral Old Goa Church Golden Bell
Pope Francis Death: गोव्यातील चर्चमध्ये शोक व्यक्त करण्यासाठी घंटानाद! पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली; आर्चबिशप जाणार व्हॅटिकनला

सखोल चौकशी करावी

ही गोल्डन बेल दुरुस्त करण्यासाठीचा अर्ज एएसआयकडे पोहचेपर्यंत पोप यांच्यावरील अंत्यसंस्कार पूर्ण होतील त्यामुळे समान विचारसरणीच्या स्थानिक लोकांनी एकत्र येऊन ही घंटा दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.

घंटा दुरुस्त करण्यात आली, मात्र त्याची तपासणी करून कायमची दुरुस्ती करण्याची गरज आहे. क्लॅपर जाणुनबुजून घंटेपासून वेगळा करण्यात आला आहे. त्यामुळे ती वाजवता येणार नाही. त्यामुळे या घंटेची ज्याने तोडफोड केली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, असे ग्लेन काब्राल यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com