Old Goa: जुने गोवेत ‘कायम सुविधा’ला ‘खो’! सरकार अडचणीत; पुरातत्व सर्वेक्षण, चर्चला द्यावे लागणार तोंड

Old Goa Development: कोणताही मॉल बांधला जात नसल्याचे सरकारने विधानसभेत स्पष्ट केले तरी तो विषय चर्चेतून अद्याप बाद ठरलेला नाही.
Old Goa Area
Old Goa ChurchX
Published on
Updated on

पणजी: जुने गोवे येथील चर्च संकुल परिसरात पर्यटक, भाविकांसाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खो बसला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हा केंद्र सरकारचा विभाग आणि चर्चचे व्यवस्थापन अशा दोन आघाड्यांवर सरकारला तोंड द्यावे लागणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते या प्रकल्पाला आधीपासूनच विरोध करत आहेत. त्या ठिकाणी कोणताही मॉल बांधला जात नसल्याचे सरकारने विधानसभेत स्पष्ट केले तरी तो विषय चर्चेतून अद्याप बाद ठरलेला नाही. अजूनही सरकारने तेथे बफर क्षेत्राबाहेरही कायम स्वरूपी बांधकामे करू नयेत, अशी मागणी केली जात आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ने सोमवारी पर्यटन खात्याला जुने गोवे येथील विकास प्रकल्पासाठी सुरू असलेले उत्खनन थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश योग्य नोंदणी करण्यासाठी देण्यात आले आहेत, कारण उत्खननावेळी काही तोफेचे गोळे सापडले आहेत, जे पोर्तुगीजकालीन शस्त्रागारातील असण्याची शक्यता आहे.

हा विकास प्रकल्प केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत राबविला जात आहे, ज्यामध्ये पर्यटक सुविधा केंद्र आणि पार्किंग क्षेत्राच्या बांधकामाचा समावेश आहे.

भारतीय पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधीक्षक पुरातत्त्ववेत्ता डॉ. किशोर रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेच्या सफाईच्या कामात काही तोफेचे गोळे आढळले आहेत. त्यामुळे पर्यटन खात्याला काम तात्पुरते थांबवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून त्या वस्तूंची योग्यप्रकारे नोंदणी (फोटोग्राफी, चित्रांकन आणि अहवाल तयार करणे) करता येईल. हा प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

Old Goa Area
Old Goa History: सफर गोव्याची! खिलजीच्या आक्रमणानंतर मांडवी किनाऱ्यावरच्या 'हेळे'ला राजधानीचा दर्जा लाभला

या प्रकल्पासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व चर्च व्यवस्थापन यांची मंजुरी नसल्याची माहिती आता समोर आली आहे. शवदर्शनावेळी सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून तेथे तात्पुरत्या सुविधांची निर्मिती केली होती. त्यामुळे कायम स्वरूपी सुविधांना चर्चचे व्यवस्थापन आडकाठी आणणार नाही, असे सरकारला वाटले. तोच विचार त्यांच्या सध्या अंगलट आल्यात जमा झाला आहे. चर्चने आपण या विकासकामांना परवानगी दिली नसल्याचा खुलासा केला आहे.

Old Goa Area
Old Goa Excavation: जुने गोव्यात उत्खननात सापडले पोर्तुगीजकालीन तोफगोळे; पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून कामाला स्थगिती

‘प्रसाद’अंतर्गत मिळणार या सुविधा

पर्यटक सुविधा केंद्र ः जुने गोवे येथे येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक असलेल्या माहितीपूर्ण सेवा, मार्गदर्शन, आणि स्थानिक इतिहासाची माहिती पुरवण्यासाठी आधुनिक पर्यटक सुविधा केंद्र उभारणे. हेरिटेज संवर्धन ः जुन्या गोव्याच्या ऐतिहासिक चर्च आणि इतर स्मारकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच परिसर सौंदर्यीकरणासाठी स्वच्छता, गार्डनिंग आणि प्रकाशयोजना विकसित करण्याची गरज आहे. आपत्कालीन सेवा ः पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे.स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना ः या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक, गाईड्स आणि हस्तकला विक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे परिसराच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com