
St Andre Scrapyard Fire News
पणजी: सांत आंद्रे येथे रविवारी सकाळी सातच्या सुमारास गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेल्या भंगारअड्ड्याला (स्क्रॅपयार्ड) आग लागली. कचऱ्यात असलेल्या प्लास्टिक व फायबर केबल्समुळे आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ती आटोक्यात आणण्यात यश आले.
ही आग कशामुळे लागली याची माहिती दलाच्या अधिकाऱ्यांना मिळालेली नाही. यासंदर्भात वीज खात्याला पत्र पाठवून त्याची तपासणी करून आगीमागील कारण शोधण्याची शिफारस केली जाईल अशी माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सांत आंद्रे येथील मौळा-बाती येथे गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याचे ढीग असलेला भंगारअड्डा होता. तो गेल्या काही वर्षापासून बंद होता. त्याच्यापासून काही अंतरावर लोकवस्ती आहे, मात्र आगीचा फटका या वस्तीला बसला नाही. सकाळी ७ च्या सुमारास या भंगारअड्डा येथील कचऱ्यामधून धूर येऊ लागला.
काही क्षणातच तेथील कचऱ्याने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. लगेच पाण्याचे बंब घेऊन जवान पोचले. आगी भडकल्याने पणजी येथूनही पाण्याचा मोठा बंब बोलावण्यात आला. ही आग विझविण्यासाठी तीन पाण्याचे बंब वापरण्यात आले. ही आग कशी लागली याबाबत स्थानिकांनाही माहीत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.