Bicholim Fire Incident: अनर्थ टळला! लाखेरे- डिचोली येथे घराला आग; एका लाखांचे नुकसान

Lakhere Bicholim Fire News: प्रतीक्षा पेडणेकर यांच्या कौलारू घराला ही आग लागली. आगीची घटना घडली, त्यावेळी घरात कोणीही नव्हते.

Lakhere Bicholim Fire News

डिचोली: सर्वत्र थर्टी फर्स्ट आणि नववर्षाची धामधूम सुरू असतानाच, मंगळवारी रात्री डिचोलीतील लाखेरे येथे एका गरीब महिलेच्या घराला आग लागण्याची घटना घडली.

या आगीत एक लाखापेक्षा अधिक किमतीचा ऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग वेळीच नियंत्रणात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रतीक्षा पेडणेकर यांच्या कौलारू घराला ही आग लागली. आगीची घटना घडली, त्यावेळी घरात कोणीही नव्हते. रात्री घर बंद करून प्रतीक्षा आपल्या मुलीसमवेत डिचोली येथे माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे या घटनेत मोठा अनर्थ टळला.

या घटनेत घराच्या एका बाजूने राहणारे एक भाडेकरू कुटुंबही बचावले. देवासमोर लावलेल्या निरांजनामधील पेटत्या वातीमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत घराच्या छपरावरील वासे तसेच घरातील भांडीकुंडी आदी साहित्य भस्मसात झाले.

दोन लाखांची मालमत्ता वाचवली

या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. ड्रायव्हर ऑपरेटर संदीप परब यांच्यासह महेश नाईक, हर्षद सावंत आणि संतोष माजिक या जवानांनी मदतकार्य केले. दोन लाखांची मालमत्ता वाचवण्यात दलाला यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com