Khotodem Fire News: खोतोडे येथे आगीचे थैमान! रिकव्हरी शेडमधील साहित्य जळून खाक

Khotodem Shed Fire: खोतोडा पंचायतीच्या मालकीच्या ‘एमआरएफ’ शेडमधील कचऱ्याला अचानक आग लागून यात असलेला कचरा जाळून खाक झाला तर शेडचे मोठे नुकसान झाले.

Khotodem Fire Incident

वाळपई: खोतोडा पंचायतीच्या मालकीच्या ‘एमआरएफ’ शेडमधील कचऱ्याला आज सायंकाळी ५ वा.च्या दरम्यान अचानक आग लागून यात असलेला कचरा जाळून खाक झाला तर शेडचे मोठे नुकसान झाले. वाळपई अग्निशमन दलाच्या जवनांकडून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या शेडला आग कशी लागली हे कळू शकले नाही.

दरम्यान, खोतोडा पंचायत क्षेत्रातील कचरा रोजच्या रोज पंचायतीतर्फे गोळा करून या शेडमध्ये ठेवला जातो व नंतर तो सळगाव येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पात नेला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील कचरा नेला नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा शेडमध्ये पडून होता आणि आज ही अचानक कचऱ्याला आग लागली. या शेडच्या काही अंतरावर सरकारी प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता वक्त केली आहे.

रेवोड्यात वाचनालयाच्या खोलीला आग

बार्देश येथील रेवोडा ग्रामपंचायतीच्या ‘एमआरएफ’ शेड तसेच पंचायत मालकीच्या वाचनालय खोलीला आग लागल्याने अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (ता.४) रात्री १० वा.च्या सुमारास घडली. म्हापसा अग्निशमन दलाने वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com