Goa News : ‘विज्ञानधारा’तील व्याख्यात्यांचा सन्मान; पर्वरीत कार्यक्रम

Goa News : उच्च शिक्षण संचालनालय, गोवा उच्च शिक्षण परिषदेचा पुढाकार
Goa
GoaDainik Gomantak

Goa News :

पर्वरी, उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा उच्च शिक्षण परिषद यांच्यावतीने विज्ञानधारा व्याख्यानमालेतील २०० व्याख्यात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पर्वरी येथील एससीईआरटी इमारतीत झालेल्या या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, गोवा संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन. के. जनार्थनम्, विज्ञानधारेचे मुख्य समन्वयक डॉ. विठ्ठल तिळवी, डॉ. महेश माजिक आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागत भूषण सावईकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वंदना सावंत यांनी केले.

वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक : लोलयेकर

कलेतही विज्ञान असते. ते आपण शोधायला हवे. भारतीय संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे महत्त्वाचे मूल्य असून विज्ञानधारेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक संस्कृतीची रुजवणूक होत आहे, असे राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आपल्या मनोगतात म्हणाले.

Goa
Goa News : विदेशातील काजूवर आयात शुल्क वाढवा! बागायतदारांची मागणी

विज्ञानधारेचा ७० हजार विद्यार्थ्यांना लाभ

विज्ञानधारा व्याख्यानमालेतील ५३० व्याख्यानांचा जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांना लाभ झाला. राष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक संस्था, गोवा विद्यापीठ, महाविद्यालये यातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, असे उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com