गोव्यात उद्या 3 तासात निकाल स्पष्ट होणार: निवडणूक अधिकारी

मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल.
Goa Election Counting News | Goa Election News updates
Goa Election Counting News | Goa Election News updatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात उद्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि तीन तासातच निकाल स्पष्ट होतील.

Goa Election Counting News | Goa Election News updates
मुलांना समजून घेणे गरजेचे: अरुण नाईक

पत्रकारांना संबोधित करताना जिल्हा निवडणूक अधिकारी उत्तर अजित रॉय म्हणाले, सकाळी 6.30 वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येईल आणि सकाळी 8:00 वाजता पोस्टल बॅलेटच्या
मतमोजणीला सुरुवात होईल. सर्व मतदारसंघात सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन (Phone) वापरण्यास रिटर्निंग अधिकारी आणि निरीक्षकांना व्यातरिक्त कुणालाही परवानगी नसेल, असे रॉय यांनी सांगितले. (Goa Election News updates)

मतदान पेटीशी छेडछाड?
निवडणुकीवेळी म्हापसा (Mapusa) मतदार संघासाठी अपंग तसेच वयोवृद्ध व्यक्तींकडून मतदान करण्यात आले होते. त्या मतदान पेटीशी छेडछाड झाल्याचा आरोप रिव्हुलिशनरी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेने म्हापशात बुधवारी दिवसभर मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले.

दरम्यान, यासंबंधात आरजीचे रोहन सांळगावकर यांनी म्हापसा पोलिस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी (North Goa Collector Office) कार्यालय तसेच पणजीतील निवडणुक निर्वाचन अधिकार्यांच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली. तसेच त्यांनी या घटनेमागचे गुढ शोधून काढण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना रॉय म्हणाले, रॉय म्हणाले की मतपेट्या सुविधा केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या आणि ECI च्या निर्देशानुसार सर्व मतपत्रिका स्ट्राँग रूममध्ये नेण्यासाठी उघडण्यात आल्या होत्या.

Goa Election Counting News | Goa Election News updates
तृणमूल-मगोच्या पाठिंब्यासाठी सशर्त अटी: राजेंद्र काकोडकर

मतमोजणी दिवशी दारू विक्रीवर बंदी
राज्यात या दिवशी मद्यविक्रीवर बंदी असली तरी रेस्टॉरंट्स सुरू ठेवता येतील मात्र मद्यविक्री करता येणार नाही. मतमोजणीपासून सुमारे 200 मीटर अंतराच्या क्षेत्रात कोणत्याही आस्थापनाला तसेच दुकाने खुली ठेवता येणार नाही असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ही मद्यविक्री बंदी बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार असून ती मतमोजणी संपेपर्यंत असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. या मतमोजणीवेळी आल्तिनो - पणजी (Panaji) येथील तंत्रनिकेतन इमारतीच्या सभोवताली असलेल्या प्रवेशद्वाराबाहेर गर्दी होणार असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com