300 कोटींच्या प्रॉप्रर्टीसाठी आधी बापाच्या खूनाचा प्रयत्न नंतर पोटच्या मुलाचे अपहरण; बंगळुरूच्या बिझनेसमनला गोव्यात अटक

मालमत्ता आणि घरगुती वादातून केले मुलाचे अपहरण
Bengaluru businessman arrested in Goa
Bengaluru businessman arrested in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Bengaluru businessman arrested in Goa: मालमत्तेवरून लिव्ह इन पार्टनरसोबत वाद झाल्यानंतर स्वत:च्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी बंगळुरूच्या बिझनेसमनला गोव्यात अटक करण्यात आली आहे. पाच वर्षीय मुलाला आईने शाळेत सोडल्यानंतर या व्यक्तीने मुलाचे अपहरण केले.

महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली, त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी हरीकृष्ण या व्यावसायिकाला शनिवारी गोव्यात अटक केलीय.

हरिकृष्ण असे अटक करण्यात आलेल्याचे व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील रहिवासी आहे. हरिकृष्णने 16 जून रोजी, मुलाचे शाळेतून अपहरण केले. हरिकृष्ण गेल्या आठ वर्षांपासून एका महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांमध्ये मालमत्ता आणि घरगुती गोष्टींवरून वाद सुरू आहे. अशी पोलिसांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

हरिकृष्ण याने लिव्ह इन पार्टनरकडे मुलाचा ताबा देण्याची मागणी केली. दरम्यान, महिलेने नकार देत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मुलाचा ताबा त्याच्या आईकडे दिला, यामुळे हरिकृष्ण बिथरला होता. दरम्यान, पाच वर्षीय मुलाला त्याची शाळेत सोडून गेल्यानंतर संधीचा फायदा घेत हरिकृष्ण याने मुलाचे शाळेतून अपहरण केले.

Bengaluru businessman arrested in Goa
शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या अन् वाटेत डोक्यावरून कंटेनर गेला; मुंबई-गोवा महामार्गावर ZP शिक्षिका ठार

वडिलांनाही केला होता जीवे मारण्याचा प्रयत्न

हरिकृष्ण याने यापूर्वी वडिलांचा देखील जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याने वडिलांना मारण्यासाठी भाडोत्री मारेकरी नेमले होते. मारेकऱ्यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी हरिकृष्णचे वडिल सिंगनमल माधव यांच्यावर चाकू हल्ला देखील केला होता. माधव एका खाण कंपनीचे मालक असून, त्यांच्या नावे 300 कोटींची मालमत्ता आहे. याप्रकरणी पोलिसांनी हरिकृष्ण याच्यासह आणखी एकाला अटक केली होती.

दरम्यान, हरिकृष्ण जामीनावर बाहेर असून, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशी माहिती पोलिसांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com