मुरगाव पालिकेत 'आयत्या पीठावर रेघोट्या' ओढण्याचा प्रकार!

एका कर्मचाऱ्याच्या जागी भलताच सही करून पगार घेत असल्याचा प्रकार उघडकीस
Scam in Mormugaon Palika
Scam in Mormugaon PalikaDainik Gomantak
Published on
Updated on

Scam in Mormugaon Palika: वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून बढती दिली असतानासुध्दा या पदाचा ताबा आजपर्यंत न देता तुळशीदास कासवकर या मुरगाव पालिका कर्मचाऱ्याला अंधारात ठेवून वरीष्ठ पर्यवेक्षक म्हणून काम करून घेत असल्याचा मुरगाव पालिका (Mormugaon Palika) गॅरेजमधील प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या जागी भलताच सही करुन तसेच कामावर गैरहजर राहून रजिस्टरवर सफेद शाई लावून सह्या मारुन पगार वठवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच अनेकांची इतर पदांसाठी बढती झाली असताना सुद्धा ते बढतीपासून वंचित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुख्याधिकारी जयंत तारी तसेच पालिका मंडळाने या विषयी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

मुरगाव पालिकेत तुळशीदास कासवकर हा कर्मचारी गेली कित्येक वर्षे सफाई विभागात दारोदारी कचरा गोळा पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहे. दरम्यान कासवकर यांना 2019 साली पालिका स्टोअर मेंटेनन्स विभागात वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून बढती देण्यात आली होती. यावेळी पालिका प्रशासक गुरुदास पिळणकर यांनी आदेश जारी केला होता. तर बढतीचा आदेश 2020 साली मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांच्या कार्यकाळात देण्यात आला होता. (Scam in Mormugaon Palika)

Scam in Mormugaon Palika
व्हिक्टर आल्बुकर्क यांचे निधन

दरम्यान पालिका संचालकाच्या आदेशानुसार पर्यवेक्षक तुळशीदास कासकर यांची वरिष्ठ पर्यवेक्षक परिवर्तित झाली असताना सुद्धा त्याला त्याचा ताबा आजपर्यंत देण्यात आला नाही. त्याच्याकडून काम मात्र वरिष्ठ पर्यवेक्षकाचे करवून घेतले जाते. रजिस्टरवर सही मात्र सुभाष नाईक वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून करत आहे. तेही रजिस्टरवर सफेद शाही लावून. पण प्रत्यक्षात कामावर गैरहजर असतो. त्याची बढती स्टोअर मेंटेनन्स विभागाचे ऑटोमोबाईल अभियंता अक्षय मडकईकर यांना सहाय्यक म्हणून करण्यात आली आहे. मात्र त्यालाही सहाय्यता न करता नाईक हा गैरहजर राहत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून बढतीचा आदेश पालिका संचालकांकडून असतानासुद्धा तुळशीदास कासवकर यांना गेली दोन वर्षे अंधारात ठेवून त्यांना बढती न देता त्याच्याकडून वरिष्ठ पर्यवेक्षकाचे काम करवून घेण्याचा प्रकार मुरगाव पालिका गॅरेजमधील प्रकार उघडकीस आला आहे.

याविषयी पालिका मुख्याधिकारी जयंत तारी तसेच पालिका मंडळाने तातडीने लक्ष घालून तुळशीदास कासवकर यांना त्याच्या बढतीच्या आदेशानुसार वरिष्ठ पर्यवेक्षकाचा ताबा देऊन त्याला त्या पदाची वेतनश्रेणी लागू करावी. अन्यथा आयत्या बिळात नागोबा हा प्रकार पालिका गॅरेजमध्ये तसाच चालू राहणार आहे. दरम्यान या विषयी तुळशीदास कासवकर यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आपल्यावर अन्याय झाला असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com