CJI Dr. D.Y Chandrachud: हवामान बदलांचा सर्वसामान्यांवर परिणाम; सरन्यायाधीशांनी गोव्यात व्यक्त केली चिंता!

Climate Change: मागील काळात झालेली औद्योगिक क्रांती तसेच इतर घटकांमुळे आज आपण मोठ्या प्रमाणात हवामान बदल अनुभवत आहोत.
CJI Dr. D.Y Chandrachud: हवामान बदलांचा सर्वसामान्यांवर परिणाम; सरन्यायाधीशांनी गोव्यात व्यक्त केली चिंता!
CJI ChandrachudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मागील काळात झालेली औद्योगिक क्रांती तसेच इतर घटकांमुळे आज आपण मोठ्या प्रमाणात हवामान बदल अनुभवत आहोत. मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे. अजून गोव्यात पाऊस पडत आहे. हवामान बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर दिसून येत असून आम्ही निसर्गाचे महत्त्व जाणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

जुना दरबार हॉल राजभवन येथे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई संपादित ‘ट्रेडिशनल ट्रीस ऑफ भारत’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी न्या. चंद्रचूड बोलत होते. यावेळी राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. दरम्यान, न्या. चंद्रचूड म्हणाले की, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी संपादित केलेले पुस्तक निसर्ग, परंपरा, झाडांचे महत्त्व कथन करते. हे पुस्तक अभ्यासनीय असून ते सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादीत व्हावे, असे आपल्याला वाटते.

CJI Dr. D.Y Chandrachud: हवामान बदलांचा सर्वसामान्यांवर परिणाम; सरन्यायाधीशांनी गोव्यात व्यक्त केली चिंता!
CJI Dr. D.Y Chandrachud: 'जागतिक आर्थिक केंद्र बनण्याची गोव्याची क्षमता, राज्याच्या विकासानं प्रभावित केलं; न्या. चंद्रचूड स्पष्टचं बोलले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, झाड हे सामाजिक, धार्मिक, पर्यावरणीय परंपरेचे प्रतीक असून प्रत्येक जीवसृष्टीत त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यपालांचे हे पुस्तक झाडांच्या महत्त्वावर भाष्य करते. ‘पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान’ याचा सुरेख संगम या पुस्तकातून आपल्याला दिसून येतो.

न्यायालय लोकांपर्यंत पोहोचवले

लोकशाहीत नागरिक सर्वोच्च असतात. सर्वसामान्यांना न्यायालयीन प्रक्रिया कळावी यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रादेशिक भाषेत निवाडे अनुवादित करण्याची प्रक्रिया सुरु केली. व्हर्च्युअल कोर्टला परवानगी दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालय लोकांपर्यंत पोहोचवले, असे प्रतिपादन राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Super El Nino Weather Pattern Pacific Ocean
Goa Climate Technology Projects
Canacona Coarse Farming Affected by Rain
Supreme Court Aravali Hills Panel Time Extension Rejected
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com