सासष्टी, कावी कला ही गोमंतकातील एक हजार वर्षांपूर्वीची कला असून या वारसा कलेचे जतन व संवर्धन करणे, तसेच तिचा प्रसारही होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दामू नाईक यांनी केले.
मडगाव रवींद्र भवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय कावी कला प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर म्हणाले की, कावी कला ही गोव्याची पारंपरिक कला असून ती आत्मसात केल्यास त्यातून स्वयंरोजगारासाठी वाव आहे.
समारोप सोहळ्यात प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार अवनी नाईक यांनी मानले. व्यासपीठावर रवींद्र भवनचे सदस्य गोपाळ नाईक उपस्थित होते. प्रशिक्षणावेळी सागर यांना सारंग आणि अश्र्वेक नाईक यांनी मदत केली.
या शिबिरात सहभागी झालेले मयंक नाईक, स्वामिनी नाईक शिरोडकर, तेजा गरड, सुमित्रा बागकर, गार्गी पाठक, सिद्धी पाटील, निशिता नाईक, अनिशा प्रभुदेसाई, शर्वा हुडेकर, नित्यश्री नाईक, अश्नी पै दुकळे, आश्र्विनी पै दुकळे, आरती नाईक यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
पंतप्रधानांकडून गौरव
आडपई येथील सागर नाईक मुळे हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार असून त्यांच्या कावी कलेचा अभिमानाने उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ८४ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात करून त्यांचा गौरव केला होता. सागर यांनी या कलेला नवसंजीवनी दिली आहे. कलाकारांनी आपली कला तळमळ आणि आत्मियतेने पुढे नेणे गरजेचे आहे, असेही नाईक यावेळी म्हणाले.
कावी कला लुप्त होऊ नये, यासाठी माझा प्रयत्न आहे. ही कला म्हणजे माती व रंगांचा खेळ असून त्यापासून कलाकृती तयार करताना संयम, एकाग्रता आणि आवड महत्त्वाची असते.
- सागर नाईक मुळे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.