Yuri Alemao: काणकोणकरांप्रती दया दाखवून काणकोण वाचवा! असं का म्हणताहेत युरी आलेमाव?

1500 कोटी खर्च केल्यानंतर गेल्या 20 वर्षांत इफ्फी आणि ईएसजीने किती नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या? आलेमाव यांचा सरकारला प्रश्न
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

भविष्यातील काणकोणकरांप्रती दया दाखवून काणकोणला आपत्तीपासून वाचवणे हे आता काणकोणकरांच्याच हातात आहे. मी काणकोणकरांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी लोलयें येथील पर्यावरण-संवेदनशील भगवती पठारावरील फिल्मसिटी प्रकल्पासाठी संमती देऊ नये, अशी आर्त हाक विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घातली आहे.

गोव्यातील जमीन आणि रिअल इस्टेट माफियांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भाजप सरकार गोव्यातील प्रत्येक इंच जमिनीवर डोळा ठेवून आहे. काणकोणकरांनी सत्तरीच्या येथील शेळ मेळावली शेतकऱ्यांसारखाच खंबीरपणा दाखवून फिल्मसिटी प्रकल्पाला विरोध करावा.

आपल्या गावची भूमी तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी अशीच राहू द्या, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फिल्मसिटीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तसेच इफ्फी आणि ईएसजीवर श्वेतपत्रिका जारी कराव्यात. यावरून फिल्म सिटी प्रकल्पाचा गोव्याला कसा फायदा होईल यावर बराच प्रकाश पडेल. गेल्या 20 वर्षात इफ्फी आणि ईएसजीने काय साध्य केले हे देखील यावरून स्पष्ट होईल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यात मोठ्या धूमधडाक्यात आणण्यात आलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आता “इंटरनेशनल फ्रॉड फेस्टीवल" मध्ये बदलला आहे. सरकारने गेल्या 20 वर्षांत इफ्फी आणि ईएसजी वर जवळपास 1500 कोटी खर्च केले आहेत. दरवर्षी सरकार महोत्सवाच्या आयोजनावर राज्य आणि स्थानिक चित्रपट निर्मात्यांना कोणताही फायदा होत नसताना सुमारे 50 कोटी खर्च करते, युरी आलेमाव यांनी उघड केले.

एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) जी स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून स्थापन करण्यात आली होती ती आता "एक्स्ट्रॅव्हॅगंट सोसायटी ऑफ गोवा" बनली आहे.

जवळपास 10 वर्षांपासून गोवा चित्रपट अनूदान योजना ईएसजीने बासनात बांधून ठेवली आहे. ईएसजीने गेल्या 20 वर्षांत किती नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत? फिल्मसिटीमुळे नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा करणाऱ्यांना सरकारला काणकोणकरांनी हा प्रश्न विचारावा, असे युरी आलेमाव म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथील बहुचर्चित कन्व्हेन्शन सेंटरचे काय झाले हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन 2019 मध्ये च50 व्या इफ्फीवेळी करण्याचे भाजप सरकारनेच जाहिर केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य चित्रपट महोत्सव का आयोजित केला जात नाही? गोव्याचे चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागात का दाखवले जात नाहीत? असे प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केले आहेत.

प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे आता चित्रपट निर्मात्यांना संगणकाच्या स्क्रीनवर सर्व काही तयार करण्याची सुविधा देते. बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून कोणतेही गंतव्य किंवा स्थान संगणकावर तयार केले जाऊ शकते. चित्रपट निर्माते आता नाविन्यपूर्ण कल्पना स्वीकारून निर्मिती खर्चात बचत करतात. कृत्रिमरीत्या तयार केलेल्या लोकेशन सेट्ससह फिल्मसिटी ही संकल्पना कालबाह्य झाली आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com