

Luthra brothers detained Thailand: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्नितांडवामध्ये २५ लोकांचा बळी घेतल्यानंतर भारतातून पळून गेलेले क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा या दोन्ही बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गोवा पोलिसांसाठी एक मोठे यश मानले जातेय.
दिल्लीतील प्रसिद्ध उद्योजक असलेले लुथरा बंधू 'रोमिओ लेन' या क्लब शृंखलेचे मालक आहेत, ज्याचे आऊटलेट्स २२ शहरांमध्ये आणि चार देशांमध्ये आहेत. गोव्यातील क्लबला आग लागल्यानंतर काही तासांतच ते थायलंडमधील फुकेट येथे पळून गेले होते.
या दोन्ही बंधूंवर सदोष मनुष्यवध (Culpable Homicide not amounting to murder) आणि निष्काळजीपणा (Negligence) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोवा पोलिसांनी यापूर्वीच त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेऊन 'ब्ल्यू कॉर्नर नोटीस' जारी केली होती.
गुन्हेगारी तपासाचा एक भाग म्हणून गोवा पोलिसांनी लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माहितीनुसार, पासपोर्ट अधिनियम, १९६७ च्या कलम १०अ (Section 10A of the Passports Act, 1967) नुसार केंद्र सरकार किंवा अधिकृत अधिकारी पासपोर्ट निलंबित करू शकतात. पासपोर्ट निलंबित झाल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अवैध ठरते. लुथरा बंधू आधीच थायलंडमध्ये असले तरी, या निलंबनामुळे त्यांना पुढे कोणत्याही देशात पळून जाता येणार नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पासपोर्ट निलंबित करणे हे गुन्हेगारी तपासामध्ये एक सामान्य पाऊल असून कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्याशिवाय ते पुन्हा सक्रिय केले जात नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील कारवाई म्हणून त्यांचे पासपोर्टऔपचारिकरित्या रद्द केले जाण्याची शक्यता आहे.थायलंडमध्ये ताब्यात घेतल्यानंतर, आता भारतीय तपास यंत्रणा लवकरच त्यांच्या डेपोर्टेशनची प्रक्रिया सुरू करतील आणि त्यांना भारतात आणले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.