Sattari News : गावांमध्‍ये शिक्षणाचा दर्जा वाढवणार : डॉ. दिव्‍या राणे

Sattari News : खोतोडा सरकारी प्राथमिक शाळेला ‘अल्‍कॉन’ कंपनीतर्फे बेंच प्रदान
Mla Deviya Rane With Student
Mla Deviya Rane With Student Dainik Gomantak
Published on
Updated on

Sattari News :

वाळपई, आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्‍याबरोबरच शाळेत सर्व प्रकारच्‍या सोयीसुविधा पुरविण्‍याची गरज आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासह शाळेचा दर्जा वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, त्‍यांनी आपल्या जवळच्या सरकारी शाळा बंद पडू नयेत यासाठी सहकार्य करावे. आम्ही गावाच्या विकासात सदैव सर्वांसोबत असून कोणालाही काहीच कमी पडू देणार नाही, असे आश्‍‍वासन पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिले.

खोतोडा-सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेत ‘अल्‍कॉन’ कंपनीतर्फे मुलांसाठी देण्यात आलेल्या बाकांच्या (बेंच) वितरण कार्यक्रमात राणे बोलत होत्‍या. यावेळी कंपनीचे जोशी, कामत, महेश राणे, अनुपना बांदेकर, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, सत्तरी भागशिक्षणाधिकारी भालचंद्र भावे, खोतोडा सरपंच रोहिदास गावकर, नंदिनी म्हाळशेकर, आरती घोलकर, राजाराम परवार, इतर पंच व नागिरकांची उपस्थिता होती.

ग्रामीण भागात बहुतांश गरीब मुले शिक्षण घेत असतात. या मुलांना शिक्षणाच्‍या चांगल्‍या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्‍यात यासाठी आपले व आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांचे प्रयत्न आहेत. मुलांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी शाळेला लागणारे साहित्य मागणीनुसार पुरविले जात आहे. प्राथमिक शिक्षणातूनच मुलांचा शिक्षणाचा पाया मजबूत होतो. परंतु अलीकडे गावांतील शाळांमधील मुलांची पटसंख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे, अशी खंत राणे यांनी व्‍यक्त केली.

Mla Deviya Rane With Student
Goa Politics: धेंपे घराण्यातील सुनेचे दक्षिण गोव्यात आदरातिथ्य होण्याचा भाजपला विश्‍वास!

गावातील शाळा ही प्रत्येकाची शाळा आहे. गेल्या एक वर्षाच्या कालखंडात सत्तरीचा विकास करताना आम्‍ही टप्याटप्याने चांगल्‍या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न आहे. तालुक्‍यातील बाराही पंचायत‍ी आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचा विकास साधून पुढे जात आहेत. सत्तरीच्या जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्‍‍वासामुळेच आज हे शक्य झाले आहे, असेही दिव्‍या राणे यांनी यावेळी सांगितले. 

दरम्‍यान, यावेळी ‘अल्कॉन’ कंपनीतर्फे खोतोडा सरकारी प्राथमिक शाळेला २५ बाक देण्यात आले. तसेच नगरगाव जिल्हा पंचायत निधीतून शाळेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. यावेळी पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते

पोर्तुगीजकालीन शाळांची दुरुस्‍ती करणार

शिक्षणाचा दर्जा आज वाढत आहे. त्यामुळे मुलांना शाळेची चांगली इमारत, बसण्यासाठी चांगले बाक, फळा, पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच इतर गरजू वस्तू आवश्‍‍यक आहेत. त्‍या पुरविण्‍यासाठी सरकारबरोबरच सामाजिक संस्‍थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. या बाकांच्या सुविधेमुळे मुलांची चांगल्या प्रकारे बसण्याची सोय होणार आहे.

शाळेतील आसनव्यवस्था वाढेल. मुलांना शिक्षण घेणे अधिक आरामदायी आणि अनुकूल वातावरण उपलब्ध होईल. सत्तरीत अनेक पोर्तुगीजकालीन व जुन्या शाळेच्या इमारती आहेत. त्यांचे आता गरजेनुसार नूतनीकरण तसेच सुशोभीकरण करण्यात येत आहे, असे आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी सांगितले.

Mla Deviya Rane With Student
Goa Tourism: समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकना’ची अट

खोतोडा शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करताना अत्यंत आनंद होत आहे. कारण मुले जेव्हा वर्गात या नवीन बेंचवर बसली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझे मन भरून आले. लहान मुले ही देवाघरची फुले. त्‍यांना चांगल्‍या सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे.

- डॉ. दिव्‍या राणे, आमदार (पर्ये)

पोर्तुगीजकालीन शाळांची दुरुस्‍ती करणार

शिक्षणाचा दर्जा आज वाढत आहे. त्यामुळे मुलांना शाळेची चांगली इमारत, बसण्यासाठी चांगले बाक, फळा, पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच इतर गरजू वस्तू आवश्‍‍यक आहेत. त्‍या पुरविण्‍यासाठी सरकारबरोबरच सामाजिक संस्‍थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. या बाकांच्या सुविधेमुळे मुलांची चांगल्या प्रकारे बसण्याची सोय होणार आहे.

शाळेतील आसनव्यवस्था वाढेल. मुलांना शिक्षण घेणे अधिक आरामदायी आणि अनुकूल वातावरण उपलब्ध होईल. सत्तरीत अनेक पोर्तुगीजकालीन व जुन्या शाळेच्या इमारती आहेत. त्यांचे आता गरजेनुसार नूतनीकरण तसेच सुशोभीकरण करण्यात येत आहे, असे आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com