Goa Politics: धेंपे घराण्यातील सुनेचे दक्षिण गोव्यात आदरातिथ्य होण्याचा भाजपला विश्‍वास!

Goa Politics: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांना भाजपची दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांना भाजपची दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दोन दिवसांत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पल्लवी धेंपे यांचे सध्याच्या घडीला पारडे जड मानले जात असून, त्यांना उमेदवारी देऊन प्रदेश भाजपचा या कुटुंबाप्रती एका उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने उत्तर गोव्यात पुन्हा एकदा श्रीपाद नाईक यांच्यावर विश्‍वास ठेवलेला आहे. परंतु दक्षिण गोव्याची उमेदवारी कोणाला द्यायची, यावर दिल्लीपासून गल्लीपर्यंत बराच खल झालेला आहे. महिला उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींनी पाठविल्यामुळे जे पुरुष उमेदवार होते, ते उमेदवारीच्या शर्यतीत मागे पडले. पल्लवी धेंपे यांचे नाव उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून संघपरिवारात घेतले जात आहे. त्यामुळे जरी त्यांचे नाव जाहीर झाले तरी त्यांच्या नावाला कोणाचा विरोध होण्याची सूतरामही शक्यता नाही.

पल्लवी धेंपे या सध्या वर्तमानपत्र व्यवसाय सांभाळत असल्यातरी अधून-मधून त्या सामाजिक कार्यातही सहभागी होत असतात.

Goa Politics
CM Pramod Sawant: महिला मोर्चा हे भाजपचे बळ

दक्षिण गोव्यात धेंपे उद्योग समूहाविषयी आपुलकी आहे. खेळ असो की उद्योग, त्या माध्यमातून या कुटुंबाचे नाते जनतेशी आणि मातीशी जुळले आहे. सारस्वत समाजात धेंपे कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते. अनेक वर्षे पर्तगाळ येथील जीवोत्तम मठाशी धेंपे कुटुंब एकरूप आहे, आपल्या वडिलांनंतर श्रीनिवास धेंपे हे सध्या या मठाच्या समितीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.

देवधर्मावर विश्‍वास असणाऱ्या या कुटुंबाचा सर्व उत्सवांत सहभाग असतो. कर्नाटकातील अंकोल्याचे श्री लक्ष्मीनारायण महामाया मंदिर, नागेशी येथील देवस्थानाशी या कुटुंबाचे धार्मिक संबंध राहिले आहेत. धेंपे घराणे हे कुटुंबवत्सल तर आहेच; परंतु अत्यंत धार्मिक आहे. गोव्याच्या जडणघडणीतही या कुटुंबाने मोठे योगदान दिले आहे.

Goa Politics
Lok Sabha Election 2024: गोव्यात 7 मे रोजी मतदान 11,7,328 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

या बाजूही उमेदवारीसाठी बळकटी देतात...

विश्‍व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पल्लवी धेंपे यांचे नाव पुढे गेले आहे. विहिंपशी धेंपे कुटुंबाचे सुरवातीपासून संबंध आहेत. परिषदेच्या ‘मातृछाया’ या संस्थेच्या जडणघडणीत धेंपे कुटुंबाचा मोठा हातभार लागला. केवळ विहिंपच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही या कुटुंबाची जवळीक आहे. श्रीराम मंदिराला श्रीनिवास धेंपे यांनी एक कोटीची मदत केली आहे. विहिंपने श्रीराम प्रतिष्ठापना दिनाला त्यांना खास सपत्नीक निमंत्रित केले होते.

  • दक्षिण गोव्यातील अनेक कुटुंबे धेंपो उद्योग समूहात नोकरीसाठी आहेत. या उद्योगसमूहात काम करणारा कोणताही कर्मचारी या कुटुंबाविषयी व उद्योगाविषयी कधीच वाईट बोललेला नाही.

  • खाण क्षेत्रातही या कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. खाणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धेंपे कुटुंबाने दिलेली आपुलकीची वागणूक ही एक त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

  • मनोहर पर्रीकर व त्यांच्या कुटुंबाशी श्रीनिवास धेंपे यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. राजकारणात येण्याची संधी असतानाही हे कुटुंब त्यापासून दूर राहिले. या कुटुंबातील महिलेला पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करण्याची संधी चालून आली आहे.

  • श्रीनिवास धेंपे यांचे चुलत आजोबा वैकुंठराव धेंपे यांनी पेडण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती आणि ते पराभूत झाले होते, तर दुसऱ्या बाजूला पल्लवी या मडगावातील तिंबलो घराण्यातील. या घराण्यातील मधु तिंबलो यांनीही मडगावमधून राजकीय नशीब अजमावले होते. मात्र, तेही पराभूत झाले होते.

  • सध्याच्या पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे या पल्लवी धेंपे यांच्या चुलत बहीण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com