Rahul Death Case VIDEO: सॉरी नको, माझा मुलगा परत द्या! राहुलच्या आईची 'दीपविहार'च्या प्राचार्यांना आर्त विनवणी, शाळेनं जबरदस्तीनं मुलांना धबधब्यावर नेल्याचा आरोप

Sattari waterfall drowning case: ‘तुमचं सॉरी नको, माझा मुलगा मला परत द्या’ अशी आर्त विनवणी करतानाच ‘माझा मुलगा मला परत देऊ शकता काय’ असा संतप्त प्रश्न राहुलच्या आईने विचारला.
Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Sattari waterfall drowning case Deepvihar school student deathDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: राहुल बिंद याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन करण्यासाठी रविवारी सकाळी आलेले दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व इतरांना ‘तुमचं सॉरी नको, माझा मुलगा मला परत द्या’ अशी आर्त विनवणी करतानाच ‘माझा मुलगा मला परत देऊ शकता काय’ असा संतप्त प्रश्न राहुलच्या आईने विचारला.

या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार असल्याचे राहुलच्या नातेवाईकांनी यावेळी सांगितले. दीपविहार विद्यालयात अकरावीत शिकणारा विद्यार्थी हा तोणीर - काजरेघाट धबधब्यात शुक्रवारी बुडून मरण पावला होता. पदभ्रमणासाठी अकरावीचे विद्यार्थी शाळेतर्फे तेथे गेले होते. राहुलवर शनिवारी सायंकाळी खारीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Goa Cricket Team Oman Tour: गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ ओमानमध्ये दाखल; दौऱ्यात दोन टी-20, तीन एकदिवसीय मिळून रंगणार एकूण 5 सामने

राहुलच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या पालकांचे सांत्वन करण्यासाठी दीपविहार विद्यालयाचे प्राचार्य व इतर राहुलच्या घराकडे आज गेले होते. मात्र, त्यांना राहुलच्या आईच्या संतापाला सामोरे जावे लागले. ‘आम्हाला तुमची सहानुभूती नको, सांत्वन नको. तुम्ही हात जोडू नका, मीच हात जोडते, माझा मुलगा मला परत आणून द्या’, असे राहुलच्या आईने सांगितले. शनिवारी राहुलचे अंतिम संस्कार करण्यात आले, तेव्हा तुम्ही कोठे होता. आज देखावा करण्यासाठी आला आहात का असे प्रश्नांमागून प्रश्न विचारले. मी व माझे पती (राहुलचे वडील) गेल्या तीन दिवसांपासून राहुलच्या आठवणीने वेडेपिसे झालो आहोत.

Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Goa Politics: सत्तेसाठी विरोधकांची मोट बांधणार कोण? काँग्रेसची यात्रा, 'आप'ची रणनीती अन् विजय सरदेसाईंची महत्त्वाकांक्षा

शाळेने जबरदस्तीने मुलांना नेले

त्या धबधब्यावर जाण्यास मनाई असतानाही तुम्ही माझ्या मुलाला मारण्यासाठी नेले होते काय, असा सवालही राहुलच्या आईने विचारला. मुले त्या ठिकाणी जाण्यास तयार नव्हते; परंतु शाळेतर्फे त्यांना जबरदस्तीने नेल्याचा दावाही तिने केला. राहुल बुडाल्याची माहिती आम्हाला उशिरा सांगितली. मी तुमच्याकडे सतत विचारणा करीत होते. परंतु तुम्ही मला योग्य माहिती का दिली नाही, असेही तिने विचारले.

Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Goa Cricket Team Oman Tour: गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ ओमानमध्ये दाखल; दौऱ्यात दोन टी-20, तीन एकदिवसीय मिळून रंगणार एकूण 5 सामने

मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणार!

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राहुलच्या काही नातेवाईकांनीही प्राचार्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांच्या संतापालाही संबंधितांना सामोरे जावे लागले. आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com