Sattari News : वारंवार बत्ती गुल; ऐन पावसात नळ कोरडे सत्तरीवासीय हैराण

दाबोस प्रकल्पात वीज खंडित; पाणीपुरवठाही ठप्प
Sattari News
Sattari News Dainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. यामुळे पेयजल पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. दाबोस पाणी प्रकल्पात सोमवारी दुपारी अडीच वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पुढील दोन दिवस सत्तरीतील विविध भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अशी गंभीर परिस्थिती उद्‍भवलेली आहे.

सत्तरीतील जवळपास ७० टक्के भागांना दाबोस प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पात जनरेटरची सोयही नाही. ज्यावेळी वीज पुरवठा खंडित होत असतो, त्यावेळी प्रकल्पाची यंत्रणा बंद पडते. परिणामी संबंधित भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. सोमवारी दुपारी अडीच वाजल्या- पासून वीज पुरवठा खंडित झालेला होता. यामुळे प्रकल्पाची यंत्रणा पूर्णपणे बंद पडलेली आहे. पावसाळा सुरू झाल्याने अधूनमधून पावसाचा जोर असतो. त्यात सत्तरीत पडझड सुरू आहे. विविध ठिकाणी वीज तारांवर झाडे पडून नुकसान होत आहेच तसेच वीज पुरवठाही खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

Sattari News
Vande Bharat Express मुळे एका नव्या क्रांतीला सुरूवात - राणे

सोमवारी रात्री फणसे नावेली येथे ३३ केव्ही फिडरवर गुलमोहराचे झाड पडल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. सत्तरीतील काही भागात लोकांना रात्र अंधारातच काढावी लागली. रात्री ९ वा. खंडित वीज सकाळी ७ नंतर पूर्ववत झाली आहे. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन अडथळा दूर केला.वीज खात्याने रात्रभर दुरूस्ती केली.

धोकादायक झाडे कापण्यासंबंधी अर्ज पडून !

खात्याने मॉन्सूनपूर्व कामे आधीच करणे गरजेचे होते. उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे धोकादायक झाडे कापण्यासंबंधी अनेकांनी अर्ज केलेला आहे. मात्र, अजून झाडे कापण्याच्या हालचाली सुरु झालेल्या नाहीत. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने दाबोस पाणी प्रकल्प बंद पडला आहे. त्यामुळे सत्तरीत अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. काही भागात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला तर काहींना पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे.

Sattari News
Mapusa Traffic congestion: शहरवासियांना वाहनकोंडीपासून मिळणार दिलासा, पालिकेकडून 'या' यंत्रणेला 'ग्रीन सिग्नल'

पावसात अनेक भागात वीज तारांवर झाडे पडून मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. खात्याची यंत्रणा २४ तास कार्यरत आहे. काल नावेली येथे ३३ केव्ही वाहिनीवर झाडे पडून मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आम्ही खात्यातर्फे रात्रभर काम करून वीज पुरवठा सकाळी पूर्ववत केला. नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.

संतोष गावस, सहाय्यक वीज अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com