Goa Monsoon 2023: सत्तरीत मुसळधार; तालुक्यात वारंवार वीज खंडितचे प्रकार

चोर्ला घाटात वाहतूक कोंडी : नद्यांच्या पातळीत वाढ; पूरस्थितीची भीती
Sattari
SattariDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023: सत्तरीत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यात अनेक भागात झाडांची पडझड सुरूच आहे.

चोर्ला घाट मार्गावर अकेशियाचे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यात वाळपई अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य करून रस्त्यावरील अडथळा दूर केला.

तसेच सोमवारी रात्री उशिरा पाडेली येथील सरकारी शाळेजवळ फणसाचे झाड वीज तारांवर पडल्याने वीज वाहिनीचे मोठे नुकसान झाले. तसेच वाहतूक कोंडीही झाली. यावेळी वाळपई अग्निशमन दल व वीज खात्याने तातडीने भर पावसात दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत केला.

काल रात्रीपासून पावसामुळे मोठा जोर धरला आहे. त्यामुळे मंगळवारीही झाडांची पडझड सुरूच होती.

सकाळी वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या संरक्षक भिंतीवर अकेशियाचे झाड उन्मळून पडले, तसेच दाबोस मार्गावरील पुलाजवळ फणसाचे झाड रस्त्यावर पडले, तसेच देसाईवाडा अडवई सत्तरी येथे जंगली झाड रस्त्यावर पडले.

त्यानंतर दुपारी सावर्शे येथे रस्त्यावर जंगली झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी सर्व घटनास्थळी वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखल होऊन मदत कार्य करून वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने हानी झाली आहे.

Sattari
Goa Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, इंधनाच्या दरात बदल; जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव

यावेळी वाळपई अग्निशमनचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देसाई, गंगाराम पावणे, विराज गावस, ज्ञानेश्वर गावस, तुळशीदास झर्मेकर, उमेश गावकर, रुपेश सालेलकर, रुपेश गावकर व इतरांची मदत कार्य केले. अधुनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे.

नद्यांच्या पातळीत वाढ; पूरस्थितीची भीती

कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक आहे.

असाच जर पाऊस सुरु राहिला तर पाण्याची पातळी वाढून पूरस्थिती उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही भागात रस्त्यावरील गटारे पाण्याने भरून वहात होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com