

वाळपई : सत्तरीला मॉडर्न तालुका बनवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. सत्तरीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय आम्ही कायम राखले आहे. भाजपने नगरगावासह संपूर्ण सत्तरीत उमेदवार देऊन आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्यावर खरे उतरण्यासाठी तुमचे मौल्यवान मत देऊन भरघोस मतांनी उमेदवारांना विजयी करा, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
नगरगाव जि. पं. निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. येथे भाजपतर्फे प्रेमनाथ दळवी हे उमेदवार आहेत. राणे म्हणाले, की ग्रामीण भागात गावोगावी कार्यकर्त्यांची भेट घेताना जुने कार्यकर्ते तितकेच महत्त्वाचे आहेत. प्रतापसिंह राणे यांचे जुने कार्यकर्ते नेहमी आमच्यासोबत होते आणि आजही ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
युवा वर्गाने पुढे यायला हवे. सत्तरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाच्या गरजांचा विचार करून विकास साधला जात आहे. पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे काम सुरूच राहील. सत्तरीला प्रत्येक बाजूने विकसित करणे आणि प्रत्येक नागरिकाचा विकास घडवणे, हे आमचे ध्येय आहे. यावेळी नगरगावच्या सरपंच उर्मिला गावस, उपसरपंच राजेंद्र अभ्यंकर, पंच संध्या खाडिलकर तसेच इतर पंच सदस्य व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आज सकाळी भाजपचे कार्यकर्ते आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ब्रह्माकरमळी, नगरगाव, साट्रे, कोदाळ, नानोडा, माळोली आणि हेदोडे येथील नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या मूल्यांवर आधारित कामकाजाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. अंत्योदयच्या भावनेतून प्रत्येक लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.