मोपा विमानतळ पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन: खासदार ओब्रायन

तृणमूल कॉंग्रेसतर्फे उगवे येथील मोपा विमानतळ पिडीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार ओब्रायन बोलत होते.
मोपा विमानतळा संदर्भात पिडीत शेतकऱ्यासोबत चर्चा करताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन.सोबत ॲड यतीन नाईक, डॅनियल डिसोझा, संतोष मांद्रेकर (Pernem)
मोपा विमानतळा संदर्भात पिडीत शेतकऱ्यासोबत चर्चा करताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन.सोबत ॲड यतीन नाईक, डॅनियल डिसोझा, संतोष मांद्रेकर (Pernem)दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

Pernem: "मोपा विमानतळासंदर्भात (Mopa Air port) शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात कसलेही राजकारण न करता  मी लोकसभेत आवाज उठवून पिडीतग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन" असे आश्वासन तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (TMC MP Derek O'Brien) यांनी उगवे येथे बोलताना दिले. तृणमूल कॉंग्रेसतर्फे उगवे येथील श्री माऊली मंदीरात मोपा विमानतळ पिडीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या  बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, संतोष मांद्रेकर व ॲड यतीश नाईक हे होते. ॲड यतीश नाईक यांनी जमीनीविषयक कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. संदीप कांबळी, रमाकांत तुळसकर , उदय महाले व महेश तुळसकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

मोपा विमानतळा संदर्भात पिडीत शेतकऱ्यासोबत चर्चा करताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन.सोबत ॲड यतीन नाईक, डॅनियल डिसोझा, संतोष मांद्रेकर (Pernem)
मुरगाव पालिकेने मासळी मार्केटमधील विक्रेत्यांचे सर्वेक्षण केलं सुरु

खासदार ओब्रायन म्हणाले कि, गोव्याचे दोन खासदार आहेत. त्यापैकी उत्तर गोव्याचे हे भाजपचे व दक्षिण गोव्याचे कॉंग्रेसचे. त्यानी विमानतळासंदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडणे गरजेचे होते. पण त्यांनी तसे केले नसले तरी त्यावर कुठलेही राजकारण न करता आमच्या नेते खासदारांशी चर्चा करून येत्या डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांची हि समस्या लोकसभेत उपस्थित करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार. बंगालमधे कॉंग्रेस व भाजपची राजवट असताना शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याविरुद्ध झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यावर गोळीबार झाला व शेतकऱ्यांचे बळीही गेले. तिथे आमच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची बाजु घेउन लढा जिंकला, असेही ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy management takeover by NDDB
Goa High Court Varca Panchayat Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com