Satari Heavy Rain: सत्तरीला मुसळधार पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

Satari Fallen Trees: वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
Satari Fallen Trees
Satari Heavy RainDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच असून कोपार्डे, म्हाऊस, आंबेली, नानोडा नगरगाव मार्गावर रस्त्यावर मोठी जंगली झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवरही झाडे पडल्याने धोका निर्माण झाला होता.

मात्र, वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.कोपार्डे येथील जुन्या पोल्ट्री फार्मजवळील रस्त्यावर तसेच वीज वाहिन्यांवर गुलमोहराचे मोठे झाड कोसळून वीज वाहिनीचे मोठे नुकसान झाले.

Satari Fallen Trees
Sattari Storm Damage: सत्तरीला वादळी वाऱ्यासह चक्रीवादळाचा तडाखा; अवकाळी पावसाचा कहर; हिवरे बुद्रूकमध्ये घरांचे नुकसान

या भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन केंद्राचे लीडिंग फायर फायटर कृष्णा सी. नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इलेक्ट्रिक कटर आणि पेट्रोल कटरच्या साहाय्याने झाड हटविले. या मोहिमेत महादेव गावडे आणि रामा नाईक यांनीही सहभाग घेतला. तसेच वीज कर्मचाऱ्याने तातडीने वीजवाहिनी सुरळीत करून वीजपुरवठा सुरळीत केला.

म्हाऊस - सत्तरी येथील सातेरी मंदिराजवळ रस्त्यावर आणखी एक जंगली झाड कोसळले, तसेच आंबेली येथील शांतादुर्गा मंदिराजवळही मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच नानोडा नगरगाव मार्गावर जंगली झाड पडून वाहतुक कोंडी झाली.

Satari Fallen Trees
Sattari Heavy Rain: सत्तरी तालुक्यात चक्रीवादळाचे धुमशान; शेकडो झाडे उन्मळून पडली; घरे, वीजवाहिन्यांचे नुकसान; अग्निशमन दलाची धावपळ

यावेळी टप्याटप्याने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अडथळे दूर केले. वरिष्ठ अग्निशमन कर्मचारी प्रदीप गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. महादेव गावडे, रामा नाईक आणि आदित्य गावस यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक कटर व पेट्रोल कटरच्या साहाय्याने झाड हटविण्यात आले.

म्हाऊस भागात अनेक झाडे पडली

दरम्यान, म्हाऊस येथेही रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली. अग्निशमन दलाचे लीडिंग फायर फायटर कृष्णा नाईक यांच्या नेतृत्वाखाली अदम खान, सुधाकर गावकर, सोमनाथ गावकर आणि आनंद शेटकर यांनी इलेक्ट्रिक कटर, पेट्रोल कटर तसेच जेसीबीच्या मदतीने झाडे हटवून वाहतूक पूर्णपणे सुरळीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com