Saptakoteshwar Temple : धर्मासह आपल्या लोकांचे रक्षण करणे ही राजाची भूमिका आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे लोकशाहीतून निवडून आलेले राजे आहेत. त्यांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.
त्याचप्रमाणे अयोध्येतील राम मंदिर आणि इतर मंदिरांचा जीर्णोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य आहे असे गौरोद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.
नार्वे-डिचोली येथील श्री सप्तकोटीश्वर नूतनीकृत मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "मंदिरे ही आपली परंपरा आहे. मंदिरे ही केवळ कार्यक्रमांपुरती मर्यादीत नाहीत. तर मंदिरांतून ऊर्जा मिळत असते."
"आपल्या देशाला मंदिरांचा वैभवशाली इतिहास आहे. परकीय आक्रमणांमध्ये मुघल, ब्रिटीशांनी हिंदू समाजाची मंदिरे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न देशभरामध्ये केला. सर्वसामान्यांना एकत्र घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना रोखण्याचे काम केले.
शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला हा एक इतिहास जागा ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यी करत आहेत असे असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.