Summer Camp : रवींद्र भवन मडगाव आयोजित उन्हाळी शिबिराला प्रतिसाद

Summer Camp : अजूनपर्यंत दगड रंगकाम, हस्तकला, टेक्स्चर आर्ट हे उपक्रम चालू असून चित्रकला, शुद्धलेखन, कोलाज आर्ट, फुलांच्या कुंडीचे रंगकाम, व्यक्तिमत्त्व विकास, स्वत:ची काळजी, किचेन मेकिंग वगैरे नावीन्यपूर्ण उपक्रमही सुरु केले जातील, अशी माहिती शिबिराच्या संयोजक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक अवनी नाईक यांनी सांगितले.
Summer Camp
Summer CampDainik Gomantak

Summer Camp :

सासष्टी,गुरुवार, ९ रोजीपासून रवींद्र भवन मडगावतर्फे आयोजित उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ७ ते १५ वर्षे वयोगटातील ७० मुले व मुली सहभागी झाली आहेत.

हे शिबिर सकाळी १० ते दु. १२.३० व दु. ३ ते सायं. ५.३० वा. अशा दोन सत्रांमध्ये घेतले जात आहे.

अजूनपर्यंत दगड रंगकाम, हस्तकला, टेक्स्चर आर्ट हे उपक्रम चालू असून चित्रकला, शुद्धलेखन, कोलाज आर्ट, फुलांच्या कुंडीचे रंगकाम, व्यक्तिमत्त्व विकास, स्वत:ची काळजी, किचेन मेकिंग वगैरे नावीन्यपूर्ण उपक्रमही सुरु केले जातील, अशी माहिती शिबिराच्या संयोजक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक अवनी नाईक यांनी सांगितले.

Summer Camp
Goa News : गोव्यात ७६.९९ मतदान टक्केवारीने रचला नवा विक्रम; निवडणूक आयोगाची अंतिम आकडेवारी

या शिबिरात मुलांना त्या-त्या कला क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. १७ मे रोजी समारोप सोहळा होणार असून सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वितरित केली जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com