Goa News : गोव्यात ७६.९९ मतदान टक्केवारीने रचला नवा विक्रम; निवडणूक आयोगाची अंतिम आकडेवारी

Goa News : राज्यात आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत १७ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम, मद्य, ड्रग्स, सोने आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी दिली.
Loksabha Election Voting
Loksabha Election VotingDainik Gomantak

Goa News :

राज्यात मंगळवारी लोकसभेसाठी विक्रमी मतदान झाले. एकूण ७६.९९ टक्के (पोस्टल मतांसह) मतदानाची नोंद करण्यात आली, जे राज्यातील आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक मतदान आहे.

राज्यात आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत १७ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम, मद्य, ड्रग्स, सोने आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी दिली. आल्तिनो येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वर्मा म्हणाले की, राज्यात शांतातापूर्ण वातावरणात निवडणूक पार पडल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

राज्यात पकडण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ही २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४० टक्के, तर २०१९ च्या तुलनेत तब्बल ५५ टक्के अधिक असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

शाईच्या तीन तक्रारी

बोटांना लावण्यात येणारी शाई ही निवडणूक आयोगाने म्हैसूर पेंट्स यांच्याकडून मागवली होती. या शाईसंदर्भात ३ तक्रारी आल्या असून त्याबाबतचा अहवाल मागवला आहे. या अहवालानंतरच नेमके घटनास्थळी काय झाले ते समजेल, असे वर्मा म्हणाले.

मतदानादिनी नोंदविलेल्या तक्रारी - १९

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी - ३८

शाईसंदर्भातील तक्रारी - ३

एकूण तक्रारी - १९०

Loksabha Election Voting
Goa News: चला मतदानाला! सिंधुदुर्ग, कारवार आणि बेळगावचे मतदार गावाला रवाना

एकूण मतदार

११७९३४४

मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या

८,९६,९५८

११,१५०

पोस्टल व इतर मतांची संख्या

११,१५०

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com