Goa Sarpanch: किनारपट्टी भागातील वीज पुरवठा सुरळीत करा, नाहीतर...

सरपंचांनी एकत्रित येऊन दिला इशारा; दक्षिण गोव्याला सावत्र वागणूक
Goa Sarpanch warns Government:
Goa Sarpanch warns Government:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sarpanch warns Government: दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात विजेचा लपंडाव ही नित्याची गोष्ट बनली असून या संबंधी वारंवार तक्रारी करुन सुद्धा त्याची कोण दाखल घेत नाही, अशी तक्रार या भागातील सरपंचांनी एकत्र येऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये वीज खात्याचा कारभार सुधारला नाही तर लोक रस्त्यावर येतील असाइशारा केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी दिली.

Goa Sarpanch warns Government:
Goa Crime: कॅसिनोमध्ये पैसे हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाची नैराश्यातून आत्महत्या, 2 तरूणींविरोधात गुन्हा

कारमोणा, ओर्ली, वार्का आणि केळशी पंचायत सदस्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या 2 महिन्यांपासून वीज पुरवठ्यातील चढउतारामुळे किनारपट्टी भागातील गावांना येणाऱ्या समस्यांची माहिती दिली, जर उन्हाळ्यात ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यात काय होईल असा सवाल वाझ यांनी यावेळी केला.

या उन्हाळ्यात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल त्यांचे म्हणणे आहे की मुख्य पुरवठा लाईन बंद आहे हे कारण असू शकत नाही.

Goa Sarpanch warns Government:
Goa Accident: भावाला भेटण्यासाठी यूपीतून गोव्यात आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याचा मृत्यू; प्राण्याला वाचवताना दुचाकीचा अपघात

प्रत्येक वेळी वीज विभागाने लवकरात लवकर समस्या सोडवावी आता आमचे रुग्ण संपले आहेत आम्ही विभागाने सोडवा अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ असा इशारा देत सरकार दक्षिण गोव्याला सावत्र आईसारखी वागणूक देत आहे अशी खंत त्यानी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला वार्काच्या सरपंच सेलू फर्नांडीस, ओर्लीचे सरपंच सायमन परेरा तसेच अन्य पंच सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com