Panchayat Election : बार्देशमध्ये 29 पंचायतींत बिनविरोध सरपंच निवड

चार ठिकाणी निवडणुका : आमदार लोबोंचा पुत्र सरपंचपदी
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

Panchayat Election : सोमवारी, बार्देश तालुक्यातील एकूण 33 पंचायतींपैकी एकोणतीस पंचायतींचे सरपंच - उपसरपंच हे बिनविरोध निवडून आले, तर सांगोल्डा, शिवोली-सडये, उसकई व नास्नोळा या चार पंचायतींमध्ये निवडणुका घ्याव्या लागल्या.

तालुक्यातील लक्षवेधी असलेल्या कळंगुट पंचायतीवर भाजपाचे जोसेफ सिक्वेरा यांनी सरशी घेत, स्वतःचे पुनरागमन केले आणि आपले पंचायत मंडळसुद्धा स्थापित केले. जोसेफ सिक्वेरा यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंच म्हणून गीता परब यांची निवड झाली. सिक्वेरा यांच्या या नवीन मंडळास सर्वच पंच सदस्यांनी पाठिंबा दिला असून यात लोबो गटातील तिघा पंच सदस्यांचा समावेश आहे.

कळंगुटमधील पर्रा, हडफडे-नागवा तसेच कांदोळी पंचायतींवर आमदार मायकल लोबोंचे निःसंशयपणे वर्चस्व राहिले, तर शिवोलीत सहापैकी पाच पंचायतींवर आमदार दिलायला लोबोंनी सरशी घेतली. तसेच हळदोणे मतदारसंघातील सहा पंचायतींपैकी तीन पंचायती या आमदार अ‍ॅड. कुर्लस फेरेरा, तर उर्वरित पंचायती या भाजपाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्याकडे गेल्या.

पर्रा पंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार लोबो दाम्पत्याचा मुलगा डॅनियल लोबो यांची बिनविरोध निवड झाली. तसेच पिर्णा पंचायतीच्या सरपंचपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे धाकटे बंधु संदीप शेट यांची बिनविरोध निवड झाली.

Goa Panchayat Election
Ulhas Tuenkar : नावेलीचा विकास हाच आपला ध्यास

साळगाव मतदारसंघातील सहा पंचायतीपैकी तीन पंचायती या आमदार केदार नाईक यांच्याकडे राहिल्या, तर माजी आमदार जयेश साळगावकर यांच्याकडे सांगोल्डा व गिरी पंचायत गेली. साळगाव पंचायतीवर या दोघांनीही आपापला दावा केला होता. दुसरीकडे पर्वरी मतदारसंघातील साल्वादोर द मुंद व सुकूर या दोन पंचायती मंत्री रोहन खंवटे यांच्याकडे आल्या.

नीळकंठ हळर्णकर यांचे सात पंचायतींवर वर्चस्व

थिवी विधानसभा मतदारसंघातील एकूण आठ पंचायतींपैकी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे सात पंचायतींवर वर्चस्व राहिले. येथील कोलवाळ पंचायत मंडळास मंत्री हळर्णकर यांचे बंधु हनुमंत हळर्णकर (प्रभाग 5) यांनीही पाठिंबा दिला. हनुमंत हे निवडणुकीत मंत्र्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com