मांद्रेतील नऊही पंचायतीचे सरपंच, उपसरपंच धरणार मगोची वाट: आरोलकर

नेत्यांकडे मतदार संघासाठी (Constituency) व्हीजन (Vision) असल्याचे सांगून काही उमेदवार पराभूत झाल्यानंतर आपले तोंडही दाखवत नाही पाच वर्षानंतर पुन्हा दाखवतात असा दावा केला.
कार्यकर्ते
कार्यकर्ते Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: भाजपा (BJP) सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे, निवडणुका पूर्वी जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमतकीयाना 10 हजार नोकऱ्या दिल्या तर आपण पूर्ण पाठींबा भाजपाला देणार आहे त्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत आपण सरकारला देतो असा पुनरुच्चार मगोचे मांद्रेचे नेते जीत आरोलकर यांनी करून जशा निवडणुका जवळ येतील तसे मतदार संघातील एकूण नऊही पंचायत (Panchayat) क्षेत्रातील अनेक सरपंच, उपसरपंच, आणि पंच मंडळी मगो पक्षात असतील असा दावा करून मगो पक्षाला मांद्रे मधून पहिला मगोचा आमदार 20 वर्षानंतर परत मिळणार असा विश्वास जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

मगो पक्षात तुयेचे उपसरपंच अमानिका मांद्रेकर,(Amanika Mandrekar) माजी सरपंच तथा विद्यमान पंच मार्गारेट लोबो, माजी पंच उदय मांद्रेकर, आणि आगरवाडा माजी सरपंच तथा पंच प्रमोद गावकर (Pramod Gavkar) आदींनी मगो पक्षात 23 रोजी प्रवेश केला.

कार्यकर्ते
गोम्सच्या मृत्यूला ‘पाखलो’ दोषी

मांद्रे येथी मगो पक्षाच्या कार्यलयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मगो पक्षाचे केंद्रीय समितीचे (Central Committee) सदस्य राघोबा गावडे, दयानंद मांद्रेकर, मगोचे नेते जीत आरोलकर आणि आगरवाडा माजी उपसरपंच तथा पंच नितीन चोपडेकर यांनी मगो पक्षाला पाठींबा दिला .

मगोचे नेते जीत आरोलकर (Arolkar) यांनी बोलताना मगो पक्षाला पुन्हा एकदा मांद्रे मतदार संघातून संजीवनी मिळणार आहे असा विश्वास व्यक्त करून स्थानिक आमदाराने (MLA) साडेचार वर्षात काहीच केले नसल्याचा दावा केला.

कार्यकर्ते
पंतप्रधान मोदींनी साधला गोव्यातील जनतेशी संवाद

सरकार कुणाच्या दारी ?

सरकार निवडणुकीवर डोळा ठेवून सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो, आता पर्यंत सरकार कुणाच्या दारी गेले असा सवाल करून सरकार केवळ कोरगाव येथे आले, ते कुणाच्या घरी गेले नाही. असा प्रश्न उपस्थित केला.

खेळासाठी पैसा कुणाचा ?

मुख्यमंत्री (CM) डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी हल्लीच प्रत्येक मतदार संघात विविध क्रीडा विषयक आणि लोककलेच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यासाठी लागणार पैसा कुणाचा खर्च करण्यात येईल याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन करून तोच पैसा गावातील क्रीडा पट्टूच्या (Sports) प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरला असता तर त्यातून नवीन खेळाडू तयार झाले असते असे जीत आरोलकर म्हणाले.

मगो पक्षाला साथ द्या:

मगो पक्षाचे सतरा वर्षे सरकार कसे होते याचा अनुभव गोमंतकीयांनी घेतला आहे. आता पुन्हा एकदा मगो पक्षाला जनता साथ देतील असा विश्वास व्यक्त करून मगो पक्षाला प्रसिद्धी पेक्षा गोमंतकीयांच्या मनात मगोच्या उमेदवारांचे चेहरे कायम स्वरूपी असल्याने मगो पक्षाचे सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला .

कार्यकर्ते
राज्यपालांनी केले गोवा सरकारचे तोंडभरुन कौतुक !

व्हिजन असलेला नेता:

मांद्रेचे आमदार मांद्रे मधून दोन वेळा आणि पेडणे मधून एकदा तर जिला सदस्य म्हणून एकदा निवडून आले त्यांनी आजपर्यंत आमदारकीची पूर्ण पाच वर्षे आणि जिल्हा पंचायतीची चार वर्षे पूर्ण केलेली नाही असा एकमेव आमदार राज्यात आपलापूर्ण काळ करू शकला नाही, विकासाची बाता मरणाऱ्यानी अर्धवट हॉस्पिटल (Hospital) IT प्रकल्प पूर्ण केला नाही. स्वतासाठी IT प्रकल्पात जमीन घेतली असा दावा केला. जीत आरोलकर हे 2019 साली पराभूत झाले त्यांनी आपले काम थांबवले नाही उलट जोमाने काम सुरु केले. अश्या नेत्यांकडे मतदार संघासाठी व्हीजन असल्याचे सांगून काही उमेदवार पराभूत झाल्यानंतर आपले तोंडही दाखवत नाही पाच वर्षानंतर पुन्हा दाखवतात असा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com