राज्यपालांनी केले गोवा सरकारचे तोंडभरुन कौतुक !

गोवा सरकारने (Government of Goa) गोव्यातील जनतेसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
Goa Governor PS Sreedharan Pillai
Goa Governor PS Sreedharan PillaiDainik Gomantak

दाबोळी: गोवा सरकारने (Government of Goa) गोव्यातील जनतेसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. येथे अनाथ आश्रम म्हणा, इस्पितळ म्हणा मोफत सेवा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर इतर राज्ये, इतर राज्यांमध्ये डायलिसिससाठी शुल्क आकारत आहेत, गोवा रुग्णालये डीडीएसएसवाय योजनेअंतर्गत (DDSSY scheme) मोफत डायलिसिस देत आहेत हे पाहून आनंद झाला असल्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (Governor PS Sreedharan Pillai) यांनी सांगितले.

झुआरी नगर (Zuari Nagar) येथील आशियाना शेल्टर होम तसेच चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी शनिवार सदिच्छा भेट देऊन पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार एलिना साल्ढाणा, मामलेदार, धीरेन बाणावलीकर, अखिल गोवा मुस्लिम जमात अध्यक्ष बशीर शेख, आशियाना शेल्टर होमचे चेअरमन अब्दुल वहिद खान, अल्ताफ शाह आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पिल्लई म्हणाले की राज भवनाच्या माध्यमातून रुग्णालये, अनाथालये आणि वृद्धाश्रमांना भेट देणे आणि गरजूंपर्यंत पोहचणे हा माझ्या दौऱ्याच्या अजेंड्याचा एक भाग आहे, या कार्यक्रमांतर्गत आपण विविध ठिकाणी इस्पितळ ओल्ड हेल्पेज व इतर ठिकाणी भेट देत असून आपणास इथली सेवा आवडली. या विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी बर्‍यापैकी काम करत आहे असे ते शेवटी म्हणाले.

Goa Governor PS Sreedharan Pillai
Goa: ‘दाबोळी’ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद झाल्यास पर्यटन व्यवसायाला फटका

राज्यपालांच्या भेटीदरम्यान त्यांनी झुआरी नगर येथील शेल्टर होम तसेच चिखली उपजिल्हा इस्पितळाची वास्तु फिरून पाहिली. शेल्टर होम मध्ये गरजूनां उपलब्ध केलेल्या सुविधा व इस्पितळातील सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी इस्पितळातील रुग्णांची विचारपूस केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com