Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

sarmanas goa ore transportation protest: धूळ आणि अन्य प्रदूषणाच्या प्रश्नावरून वीस दिवसांनंतर सारमानस येथील ग्रामस्थ सोमवारी पुन्हा रस्त्यावर उतरले. संतप्त महिलांसह स्थानिकांनी वेदांताची खनिज वाहतूक रोखून धरली.
Sarmanas Villagers Protest
Sarmanas Villagers ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: धूळ आणि अन्य प्रदूषणाच्या प्रश्नावरून वीस दिवसांनंतर सारमानस येथील ग्रामस्थ सोमवारी पुन्हा रस्त्यावर उतरले. संतप्त महिलांसह स्थानिकांनी वेदांताची खनिज वाहतूक रोखून धरली. खाण खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत वाहतूक सुरू करू देणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे दुपारपर्यंत खनिज वाहतूक ठप्प झाली.

माजी सरपंच महेश वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला घरकामे सोडून रस्त्यावर उतरल्या. खनिज वाहतुकीमुळे होणारे धूळ आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

गेल्या ५ ऑक्टोबर रोजीही सारमानसवासीयांनी खनिज वाहतूक रोखली होती. त्यावेळी मागण्यांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन डिचोलीच्या (Bicholim) उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कंपनी आणि सरकारी यंत्रणांनी ठोस पावले उचलली नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन सुरू केले.

Sarmanas Villagers Protest
Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

पिळगावच्या सारमानस भागातील नागरिकांनी पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद ठेवण्याच्या मागणीसाठी जून महिन्यापासून आतापर्यंत चार वेळा आंदोलन केले आहे. लोकवस्तीजवळ साठवून ठेवलेल्या खनिजामुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संयुक्त बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sarmanas Villagers Protest
Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात कुचराई! पालिकांना कोर्टाचा दणका; अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे आदेश

पाहणीचा अहवाल!

खाणक्षेत्रात येणाऱ्या घरांच्या पाहणीचा अहवाल दोन दिवसांत देण्याचे आश्वासन संयुक्त मामलेदारांनी दिले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. खनिज वाहतुकीदरम्यान होणारे धूळ आणि अन्य प्रदूषण रोखण्यासाठी कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. उपाययोजना न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा महेश वळवईकर यांच्यासह सारमानसवासीयांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com