Government Schemes: 'सरकार तुमच्या दारी'ला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 5,960 नागरिकांचा सहभाग

Sarkar Tumchya Dari Programme in Goa: गोवा सरकारच्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाला शनिवारी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Sarkar Tumchya Dari Programme in Goa
Government SchemesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा सरकारच्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाला शनिवारी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील दहा तालुक्यांत एकाचवेळी आयोजित कार्यक्रमांत ५९६० हून अधिक नागरिक सहभागी झाले.

या उपक्रमातून नागरिकांना मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडण्याची तसेच विविध सरकारी योजना आणि सेवांची माहिती घेण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणे येथे कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या ठिकाणी सर्वाधिक दीड हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.

Sarkar Tumchya Dari Programme in Goa
Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

सासष्टी तालुक्यात एक हजारांहून अधिक, धारबांदोडा आणि डिचोली येथे प्रत्येकी ६५०, तर सत्तरी आणि फोंडा येथे प्रत्येकी ५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मुरगावात ४०० हून अधिक, सांगेत २६०, तर तिसवाडी आणि काणकोण येथे प्रत्येकी २५० नागरिक उपस्थित होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी आपापल्या निर्धारित ठिकाणी कार्यक्रमांचे नेतृत्व केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com