२५० वर्षांची अखंडित परंपरा! ‘मेस्तां’च्या शाळेतील सरस्वती पुजनोत्सव सुरू

Mayem News: जवळपास २५० वर्षांची परंपरा असलेल्या मयेतील मेस्तांच्या शाळेत यंदाही सरस्वती पूजन उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली असून पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
Mayem News: जवळपास २५० वर्षांची परंपरा असलेल्या मयेतील मेस्तांच्या शाळेत यंदाही सरस्वती पूजन उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात  झाली असून पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
Goa Mayem Saraswati Pujanotsav Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mayem Saraswati Pujanotsav

डिचोली: जवळपास २५० वर्षांची परंपरा असलेल्या मयेतील मेस्तांच्या शाळेत यंदाही सरस्वती पूजन उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली असून पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्येची देवता म्हणजेच माता सरस्वती देवी. शारदीय नवरात्रोत्सवात बहुतेक सर्व शाळांमध्ये सरस्वती पुजनोत्सव साजरा करण्यात येतो. काही ठिकाणी मंदिरांतूनही विद्येच्या या देवीचे पूजन करण्यात येते. डिचोली तालुक्यातील मये गावात मात्र चक्क घरात सरस्वती देवीचे पूजन करण्यात येते.

पोर्तुगिज काळापासून सुरू झालेली सरस्वती पुजनोत्सवाची ही परंपरा आजही टिकून आहे. ‘मेस्तां’च्या शाळेतील दहाजणांची सरस्वती अशी ओळख असलेला हा उत्सव आजही मोठ्या उत्साहात म्हणजेच चतुर्थीच्या उत्सवाप्रमाणेच साजरा करण्यात येत असून गावातील लोक तेवढ्याच उमेदीने या उत्सवात सहभागी होत असतात. भजन, आरत्या आदी कार्यक्रमांची

रेलचेलही असते. विजयादशमीपासून पाच दिवस हा सरस्वती पुजनोत्सव साजरा करण्यात येत आहे. केळबायवाडा - मये येथील च्यारी कुटुंबातील रत्नकांत च्यारी आणि त्यांचे पुतणे बाळकृष्ण च्यारी मिळून पाचवी आणि सहावी पिढी आता हा सरस्वती पुजनोत्सव साजरा करीत आहे.गावातील नागरिक दरवर्षीप्रमाणे या पुजेला उपस्थित राहून दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत.

Mayem News: जवळपास २५० वर्षांची परंपरा असलेल्या मयेतील मेस्तांच्या शाळेत यंदाही सरस्वती पूजन उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात  झाली असून पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
Matiechem Feast 2024: व्होडेकरा व्होडेकरा...! मातीशी नाळ जोडलेला ‘मातयेचे फेस्त’

‘मेस्तां’च्या शाळेची परंपरा

पोर्तुगीज काळात केळबायवाडा - मये येथे च्यारी कुटुंबाचा सुतार व्यवसाय चालत होता. पोर्तुगीज राजवटीत शाळा नव्हत्या. तरी काही भागात गुपचूपपणे शाळा भरत असे. च्यारी यांच्या घरीही अशीच शाळा भरायची. त्यामुळे च्यारी यांच्या घराची ‘मेस्तांची शाळा’ अशी ओळख निर्माण झाली. अडीचशे वर्षांपूर्वी या शाळेत सरस्वती पुजन करण्याचा गावातील दहाजणांकडून विचार पुढे आला आणि या शाळेत सरस्वती पुजण्यात आली. मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी. अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे गावातीलच नव्हे, तर बाहेरील भाविक सरस्वती पुजन उत्सवाला येऊन सेवा अर्पण करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com