Matiechem Feast 2024: व्होडेकरा व्होडेकरा...! मातीशी नाळ जोडलेला ‘मातयेचे फेस्त’

Matiche Feast: पिळर्ण येथील गावकऱ्यांनी सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चच्या आवारात एकत्रित येऊन ‘मातीच्या फेस्ता’ची तिसरी आवृत्ती उत्साहाने साजरी केली. ‘आमची माती, आमचा आवाज’ हा यंदाच्या या फेस्ताचा विषय होता.
Matiche Feast: पिळर्ण येथील गावकऱ्यांनी सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चच्या आवारात एकत्रित येऊन ‘मातीच्या फेस्ता’ची तिसरी आवृत्ती उत्साहाने साजरी केली. ‘आमची माती, आमचा आवाज’ हा यंदाच्या या फेस्ताचा विषय होता.
Goa Matiche Feast 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Matiechem Feast 2024 At Pilern

कडक ऊन  आणि वातावरणात उष्मा असूनही पिळर्ण येथील गावकऱ्यांनी सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चच्या आवारात एकत्रित येऊन ‘मातीच्या फेस्ता’ची तिसरी आवृत्ती उत्साहाने साजरी केली. ‘आमची माती, आमचा आवाज’ हा यंदाच्या या फेस्ताचा विषय होता. लोकांना त्यांच्या नैसर्गिक मुळांची आठवण करून देणे आणि राज्यावर परिणाम करू पाहणाऱ्या पर्यावरणीय समस्यांबद्दल त्यांच्यात जागृतता निर्माण करणे हा या फेस्ताचा उद्देश होता.

‘आपण सारे मातीपासून बनलेले आहोत आणि एक दिवस आपल्याला तिच्याकडे परत जायचे आहे. जर आम्ही मातीचा नाश केला तर शेवटी ती आपलाच नाश करेल. गोव्यात आपली माती विकली आणि हरवली जात आहे. हे फेस्त (Feast) आपल्याला आठवण करून देते की आपण सारे जमीन आणि निसर्गाशी खोलवर जोडलेलो आहोत आणि आपल्याला त्यांचे रक्षण करायचे आहे’ असे आवाहन चर्चचे फादर डेरीक फर्नांडिस यांनी या फेस्ताच्या प्रारंभी जमलेल्या लोकांना केले. 

प्रतिमात्मक नौका विहाराने फेस्तातील कार्यक्रमांची सुरुवात झाली. सेंट जॉन डी बॅप्टिस्ट, सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी आणि महात्मा गांधी या व्यक्ती एकाच नौकेतून जलप्रवास करत आहेत असे दृश्य त्यातून साकार झाले होते. नौका विहारानंतर ब्रास बँडने व ‘व्होडेकरा व्होडेकरा....’ ही पारंपारिक धून आळवून गावातील पासयीला (पदभ्रमण) सुरुवात झाली.

Matiche Feast: पिळर्ण येथील गावकऱ्यांनी सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चच्या आवारात एकत्रित येऊन ‘मातीच्या फेस्ता’ची तिसरी आवृत्ती उत्साहाने साजरी केली. ‘आमची माती, आमचा आवाज’ हा यंदाच्या या फेस्ताचा विषय होता.
Nave Utsav: ४०० वर्षांची परंपरा लाभलेला 'नवे उत्सव' उत्साहात साजरा! मये, वायंगिणी आणि डिचोली ग्रामस्थांचा सहभाग

यात सारे गावकरी सामील झाले होते. शोभायात्रा हे या फेस्ताचे प्रमुख आकर्षण होते. ‘आमची मिठागरे’, ‘आमच्या झरी’, ‘आमची शेते’, ‘आमचे डोंगर’, ‘आमच्या तळी’ हे या शोभायात्रांचे विषय होते. राज्यातील संसाधनांचे जतन करण्याची ग्वाही या शोभायात्रांमधून प्रतीत होत होती. 

‘बोल्कावाच्यो गजाली’ या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धन विषयक एक विशेष विचारप्रवर्तक चर्चा पार पडली. कळशी आणि घुमट नृत्य हे सांस्कृतिक कार्यक्रम फेस्तात सादर झाले. हस्तकला, मातीची भांडी आणि गोव्याचे पारंपारिक खाद्यपदार्थ तिथे विक्रीसाठी उपलब्ध होते. या उत्सवी वातावरणात संगीत भर घालत होते. ‘मीरा मीरा’ या लोकप्रिय गाण्याचे मूळ गायक सेबी फर्नांडिस यांनीही या कार्यक्रमात गीते गायली. ‘देरेपेंत’ या बँडने आपल्या संगीताने या फेस्ताची आनंददायी सांगता केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com