गुन्हा मागे घ्या म्हणणारे सिल्वा, सार्दिन मंत्र्यावर दगडफेकीचे समर्थन करतात का? भाजप नेत्याचा सवाल

जमावात लपून भ्याडहल्ला करणाऱ्यांना दोघे लपवण्याचा प्रयत्न करतायेत का? सावियो रॉड्रिग्ज यांचा सवाल.
 Sao Jose De Areal shivaji statue controversy
Sao Jose De Areal shivaji statue controversy
Published on: 
Updated on: 

Sao Jose De Areal shivaji statue controversy

शिवजयंती आणि त्याच्या एक दिवस अगोदर सां जुझे द आरियाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादात समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर माती आणि दगडफेक झाली. यात फळदेसाई किरकोळ जखमी झाले.

याप्रकरणी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार क्रुझ सिल्वा आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यावरुन भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी दोघांच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सां जुझे द आरियाल येथील प्रकरणात स्थानिकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार क्रुझ सिल्वा आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला.

जमावात लपून बसलेल्या समाजकंटकांनी गोव्याच्या मंत्र्यावर दगडफेक करणे योग्य आहे, असे सांगण्याचा प्रयत्न दोघे करतायेत का? असा सवाल सावियो रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला. तसेच, जमावात लपून भ्याडहल्ला करणाऱ्यांना दोघे लपवण्याचा प्रयत्न करतायेत का? असेही रॉड्रिग्ज म्हणाले.

तसेच, जमावात बिगर गोमन्तकीय लोक देखील असताना, फक्त स्थानिकांविरोधातील गुन्हे का मागे घेतले जावेत? उद्या गोव्यात आणखी एखादे आंदोलन होईल, जमाव आणखी एखाद्या मंत्र्यावर दगडफेक करु शकतो, कायद्यांतर्गत हे आपण चालू देणार आहोत का? असा सवाल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला.

 Sao Jose De Areal shivaji statue controversy
देव बाबरेश्वर बाबत आक्षेपार्ह व्हिडिओ; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी RTI कार्यकर्ता गडेकर विरोधात गुन्हा

सां जुझे द आरियाल येथे 18 आणि 19 फेब्रुवारी शिवरायांच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादात स्थानिकांनी पुतळ्याचे अनावरण करुन परतणाऱ्या मंत्री फळदेसाई यांना घेराव घातला. तसेच, त्यांच्यावर माती आणि दगडफेक देखील केली.

याप्रकरणी मायणआ कुडतरी पोलिसांत 20 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार सिल्वा आणि खासदार सार्दिन यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केलीय. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सिल्वा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shivaji Maharaj Complex Bicholim Lifts
Karapur One Goa Project Protest
Shivaji Maharaj Statue Goa High Court Case
Goa Shellfish Contamination
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com