देव बाबरेश्वर बाबत आक्षेपार्ह व्हिडिओ; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी RTI कार्यकर्ता गडेकर विरोधात गुन्हा

RTI Activist booked for hurting religious sentiments: देवस्थान समितीच्या वतीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.
RTI Activist booked for hurting religious sentiments in Calangute
RTI Activist booked for hurting religious sentiments in Calangute

RTI Activist booked for hurting religious sentiments

खोब्रागडे, कळंगुट येथील देव बाबरेश्वर बाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गडेकर विरोधात कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. देवस्थान समितीच्या वतीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

देव बाबरेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काशिनाथ चोडणकर यांनी याप्रकरणी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दीपक गडेकरने देव बाबरेश्वर बाबत आक्षेपार्ह व्हिडिओ युट्युबवर अपलोड करून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप समितीने केला आहे. व्हिडिओतून आक्षेपार्ह टीप्पणी करण्यात आली असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केल्याचा आरोप समितीने केलेल्या तक्रारीतून केला आहे.

RTI Activist booked for hurting religious sentiments in Calangute
Vedanta: 165 कोटी थकबाकी असणाऱ्या वेदांताला गोवा सरकारने निर्यात परवाना कसा दिला? काँग्रेसचा सवाल

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी, मागणी अध्यक्ष चोडणकर यांनी केली होती.

दरम्यान, कळंगुट पोलिसांनी तक्रारीची दखल घेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दीपक गडेकर विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com