Bondvol Lake: ‘बोंडवाळ तलाव’ क्षेत्र अधिसूचित न केल्यास आमरण उपोषण! सांताक्रूझ ग्रामस्थांचा इशारा; कार्यवाहीस आठवड्याची मुदत

Bondvol Lake SantaCruz Protest: सांताक्रूझच्या गावकऱ्यांनी बोंडवाळ तलावाचे प्रभाव क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी सरकारला एक आठवड्याची मुदत दिली आहे.
Bondvol lake impact zone, Santa Cruz villagers protest
Bondvol lake impact zone, Santa Cruz villagers protestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांताक्रूझच्या गावकऱ्यांनी बोंडवाळ तलावाचे प्रभाव क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी सरकारला एक आठवड्याची मुदत दिली आहे. याप्रकरणी आठवड्यात कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

सांताक्रूझच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी आझाद मैदानात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी वरील मागणी केली. याप्रसंगी सांताक्रूझचे माजी उपसरपंच तथा पंच सदस्य इनासियो परेरा म्हणाले, मागील महिन्यात २६ रोजी बोंडवाळ तलावाविषयी ग्रामस्थांची बैठक झाली, २७ रोजी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी आम्हाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे घेऊन गेले.

त्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी आम्हाला आश्वासन दिले, की पाणथळ विभाग (वेटलँड डिपार्टमेंट) प्रभाव क्षेत्र सर्वेक्षणाविषयी कळविले जाईल आणि नगर नियोजन प्राधिकरणास (टीसीपी) यांना माहिती दिली जाईल, तसेच ग्रामपंचायतीस याबाबत सूचित केले जाईल, असे सांगितले. टीसीपीने तेथे येणाऱ्या बांधकामचा आदेश माघारी घेतला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

Bondvol lake impact zone, Santa Cruz villagers protest
Bondvol lake: अधिकाऱ्यांकडून न्यायाच्या प्रतीक्षेत बोंडवोल तलाव | Gomantak Tv

परंतु त्या तलावाचे प्रभावक्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे, ही आमची मागणी आहे. ते पुढे म्हणाले, वेटलँड विभागाच्या कार्यालयातही आम्ही भेट दिली आणि दिलेल्या पत्रावर काय पावले उचलली, याची विचारणा केली. तलावाचे प्रभाव क्षेत्र निश्चित न केल्यास सोमवारपासून सांताक्रूझ चर्चकडे उपोषणास बसू,असा इशारा त्यांनी दिला.

Bondvol lake impact zone, Santa Cruz villagers protest
Toyaar Lake Goa: कसे दिसते तोयार तळे? पहा Photos

‘प्रदूषण नियंत्रण’वर विश्‍वास नाही!

आर्थुर डिसिल्वा म्हणाले, बोंडवाळ तलावाचे प्रभाव क्षेत्र अधिसूचित लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. आम्ही सरकारकडे वारंवार मागणी करीत आलो आहोत. आमचा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळावर अजिबात विश्वास उरलेला नाही. आम्हाला सरकारने खोटी आश्वासने देऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले. पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी स्पष्ट राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे असूनही, राज्य पातळीवर त्यांचा विपर्यास केला जात असल्याची टीका त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com