Bondava Lake in Santacruz: सांताक्रुझचे बोंडवेल तळे का आटले; आमदार फर्नांडिस यांची चौकशीची मागणी

Bondava Lake in Santacruz: व्हॉल्व सोडल्याने पाणी गायब : चौकशीची आमदार फर्नांडिस यांची मागणी
Santa Cruz bondava- Lake
Santa Cruz bondava- Lake Dainik Gomantak
Published on
Updated on

Bondava Lake in Santacruz: राज्य सरकारने पाणथळ म्हणून अधिसूचित केलेले व्हडलेभाट-सांताक्रुझ येथील बोंडवेल तळे कोरडे पडत आहे.

या तळ्यातील पाणी तेथील व्हॉल्वला कुलूप असूनही तो खुला करून सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने त्याची पाहणी सोमवारी (ता.२७) जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसमेवत स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी केली.

याप्रकरणी पोलिस चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जलस्रोतमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली. या तळ्यातील पाणी व्हाल्व खोलून जाणूनबुजून सोडण्यात आले आहे, असे उपस्थित असलेल्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले व त्याचा अहवाल लवकरच पुढील कारवाईसाठी सुपुर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कालापूर कोमुनिदादमध्ये असलेले बोंडवेल तळे हे पाणथळ म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. या तळ्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम करून घर बांधण्यात आले आहे व त्यांनी हा व्हॉल्व सोडून पाणी गायब करण्याचा प्रकार केला असल्याचा संशय तेथील व्हडलेभाट-सांताक्रुझच्या स्थानिक लोकांना आहे.

Santa Cruz bondava- Lake
Goa School: विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन हायस्कूलच्या महिला शिक्षिकेला अटक

या तळ्याच्या संरक्षणासाठी सभोवती संरक्षक भिंत उभारण्याची तसेच व्हॉल्वच्या ठिकाणी असलेल्या लोखंडी गजाऐवजी पक्के बांधकाम करून ते सुरक्षित करण्याची मागणी जलस्रोतमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार फर्नांडिस यांनी सांगितले.

दरम्यान, या बोंडवेल तळ्यातील पाणी गायब झाल्याची माहिती मिळताच गोव्यातील आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी त्याची पाहणी केली व त्याचवेळी तेथे आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

हे तळे पाणथळ म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कालापूर कोमुनिदाद तसेच सांताक्रुझ पंचायत यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.

हे तळे बुजवून तेथे एका विकासकाने बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर तो बंद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com