गोव्यात संस्कृत भारतीतर्फे लघू चित्रपट महोत्सव! 24 रोजी पणजीत उद्‍घाटन; विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग

Sanskrit Short Film Festival: हा महोत्सव यापूर्वी दोन वेळा नाशिक, एकदा मुंबई, एकदा नागपूर व गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झाला होता.
Sanskrit Short Film Festival Goa Panaji
Sanskrit Short Film Festival Goa PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संस्कृत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्कृत भारतीने सहावा आंतरराष्ट्रीय संस्कृत लघू चित्रपट महोत्सव गोवा सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. हा भव्य सोहळा शुक्रवार २४ जानेवारी रोजी गोवा मनोरंजन संस्थेच्या सभागृहात संध्याकाळी ३.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आदित्य जांभळे यांच्या हस्ते होईल.

हा महोत्सव यापूर्वी दोन वेळा नाशिक, एकदा मुंबई, एकदा नागपूर व गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झाला होता. यंदा गोव्यात होणारा हा सहावा आंतरराष्ट्रीय संस्कृत लघू चित्रपट महोत्सव आहे. गोव्यातील पाच शाळांनी संस्कृत लघू चित्रपट स्पर्धेत सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे चित्रपट महोत्सवाचा विशेष भाग असतील.

Sanskrit Short Film Festival Goa Panaji
IFFI 2024: 'इफ्फी' म्हणजे प्रोत्साहन देण्याची जागा न्हवे! वाचा महोत्सवाचे विश्लेषण

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उज्जैन येथील कालिदास संस्कृत अकादमीचे निर्देशक गोविंद गंधे, भोपाल येथील साहाय्यक प्राध्यापक व नट डॉ. चन्नबसव स्वामी हिरेमठ, मुंबई येथील अभिनेता व दिग्दर्शक युवराज कुमार उपस्थित राहतील.

Sanskrit Short Film Festival Goa Panaji
Science Film Festival: विज्ञानाचा आगळावेगळा 'महोत्सव'! पणजीत रंगणार 'सायन्स फिल्म फेस्टिव्हल'चे दहावे सत्र

संस्कृत भाषेचा प्रसार, आधुनिक काळातील तिचे महत्त्व आणि संस्कृतमधील सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, महोत्सवात सादर होणारा लघू चित्रपट हे व्यावसायिक चित्रपट दिग्दर्शकांनी तयार केलेले नसून संस्कृत भाषेच्या प्रेमातून चित्रपट बनवले गेले आहेत. भारतासह परदेशातूनही या महोत्सवासाठी लघू चित्रपट आलेले आहेत, अशी माहिती संस्कृत भारतीने सहावा आंतरराष्ट्रीय संस्कृत लघू चित्रपट महोत्सव अध्यक्ष आनंद देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com