Classical Music: भारतीय संगीतात संस्कार, संयम, तपश्‍चर्या दिसते

नितीन कोरगावकर: पणजीत गुरुअभिवादन
Classical Music:
Classical Music: Dainik Gomantak
Published on
Updated on

कलेचे तंत्र शिकवता येते पण कला ही शिकवून येत नाही, ती संस्कारित व्हावी लागते, असे सांगून ज्येष्ठ तबलावादक नितीन कोरगावकर यांनी, आपल्या भारतीय संगीतातील शब्दांत संस्कार, संयम, तपस्या व ध्येय या गोष्टी कशा अंतर्भूत आहेत हे स्पष्ट केले.

Classical Music:
Goa Police: स्कूटरच्या बुकिंगचे आमिष; 300 हून अधिक ग्राहकांची फसवणूक, ठकसेनला गोव्यात अटक

ज्येष्ठ तबलावादक प्रेमानंद व आमोणकर शिष्य परिवारांतर्फे कला संस्कृती संचालनालयाच्या सहयोगाने संस्कृती भवन, पणजीमधील सभागृहात रविवारी झालेल्या गुरुअभिवादन कार्यक्रमात नितीन कोरगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ तबलावादक मोहन पेडणेकर यांचा कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्माननीय पाहुणे ज्येष्ठ हार्मोनियमवादक एकनाथ बोरकर, दीनानाथ बांदोडकर व प्रेमानंद आमोणकर उपस्थित होते.

सर्व वक्त्यांनी संगीत कला ही कशी कष्टाने साध्य करावी लागते याविषयी उहापोह केला. प्रेमानंद आमोणकर यांनी, आपण इतर गोष्टीत रस न घेता तबल्यावरच लक्ष केंद्रित करून संगीत क्षेत्रात वाटचाल करीत असल्याचे सांगितले .कोरगावकर यांनी, प्रेमानंद आमोणकर हे प्रसिद्धीपासून दूर राहून व्रतस्थपणे संगीत सेवा करीत असल्याचे सांगितले. सायली गर्दे हिने सूत्रसंचालन केले.विद्यार्थ्यांनी आपले गुरू आमोणकर यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.

Classical Music:
'Paper Spray' Case : पालकांच्‍या चेहऱ्यांवर काळजी, शिक्षक गंभीर, विद्यार्थी संभ्रमात

गायन वादन कार्यक्रमात ऋत्विक सावंत, अक्षय ठाकूर, गौतमी आमोणकर, भार्गवराम गर्दे यांचे तबला एकलवादन रंगले. यतीन कुंकळीकर व आकाश नाईक यांनी तबला सहवादन केले. अथर्व गायक याने बासरीवादन केले. त्याला जिग्नेश पेडणेकर याने तबला साथ दिली.कर्नाटक येथील विनायक हेगडे यांच्या बहारदार गायनाने समारोप झाला.त्यांना प्रेमानंद आमोणकर (तबला) व दत्तराज म्हाळशी (संवादिनी) यांनी पूरक अशी साथसंगत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com