Valpoi Camp : बालवयातील संस्कारातून मुले यशोशिखर गाठतात

फातर्पेकर : ब्रह्मकरमळी शाळेत शिबिर उत्साहात
Sanskar camp at Brahma Karmali Goa
Sanskar camp at Brahma Karmali GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : लहान वयातच मुलांना आपल्या हिंदू संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करून दिले पाहिजे. घरात मुलांना वेळोवेळी प्रार्थना, नामस्मरण, लहान मोठ्यांचा आदर करणे आदींचे संस्कार दिल्यास मुले पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हे संस्कार उपयोगी येतात, असे प्रतिपादन संस्कृत शिक्षक जयंत फातर्पेकर यांनी केले.

Sanskar camp at Brahma Karmali Goa
Quantum Educational Academy : परीक्षा प्रशिक्षण केंद्र काणकोणात सुरू

ब्रह्मकरमळी-सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे संस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. कुंडई येथील स्वामी ब्रह्मेशानंद संस्कृत प्रबोधन आणि स्वामी ब्रह्मानंद संस्कृत पाठशाळेतर्फे शिबिर घेण्यात आले. यावेळी फातर्पेकर यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर मुख्याध्यापिका सीमीता गावस, शिक्षक किशोर केळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना प्रार्थना, श्‍लोक, संस्कृत व इतर संस्कार विषयक विविध माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

किशोर केळकर म्हणाले, अशा संस्कार शिबिराच्या माध्यमातून मुलांना आपली संस्कृतीच्या अभ्यास शिकण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे. बालवयातील संस्कारामुळे मुले मोठेपणी आयुष्यात प्रगती करतात. तसेच आपली गौरवशाली संस्कृती जोपासतात. त्यामुळे प्रत्येक मुलांनी याचा लाभ घ्यावा.

Sanskar camp at Brahma Karmali Goa
Blood Donation Camp: रक्तदान ही सामाजिक जबाबदारी; रूपा देशप्रभूंचे प्रतिपादन

आपली संस्कृती टिकवून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांचा जसा विकास होतो, त्याप्रमाणे त्यांची बुद्दी विकसित होत असते. त्यांना लहान वयात जे शिकवतात तेच संस्कार हे आत्मसात करतात. त्यामुळे शाळेबरोबर पालकांनी देखील आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊन त्यांच्या भौतिक विकासासाठी पुढे आले पाहिजे.

- जयंत फातर्पेकर, संस्कृत शिक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com